नवी दिल्ली - जागतिक बँकेने २०२४ च्या भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात १.२ टक्क्यांनी वाढ करून ७.५ टक्के इतका केला आहे. सेवा आणि औद्योगिक क्षेत्रातील जोरदार तेजीमुळे भारताचा जीडीपी या आर्थिक वर्षात वाढू शकतो असे बँकेने म्हटले आहे तसेच वित्तीय तूट आणि सरकारवरील कर्ज कमी होऊ शकते, असाही अंदाज वर्तविला आहे.
जागतिक बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज ६.५ टक्के इतका वर्तविला आहे. जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास वेगाने होईल, असेही जागतिक बँकेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक रेटिंग एजन्सी फिचने आर्थिक वर्ष २०१४-२५ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ७ टक्केपर्यंत वाढविला आहे. देशांतर्गत निर्माण झालेली जोरदार मागणी आणि वाढती गुंतवणूक यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे ‘फिच’ने म्हटले आहे.