Join us

फक्त पाक नव्हे; अमेरिका, चीन, जपानवरही कर्जाचं ओझं; भारताचा क्रमांक कितवा? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 7:56 PM

World Bank Borrowers Countries List: जागतिक बँकेनं काही महिन्यांपूर्वीच ऋण सांख्यिकी अहवाल जाहीर केला होता. त्यात सर्वाधिक कर्ज असलेल्या टॉप-१० देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचं समोर आलं होतं

World Bank Borrowers Countries List: जागतिक बँकेनं काही महिन्यांपूर्वीच ऋण सांख्यिकी अहवाल जाहीर केला होता. त्यात सर्वाधिक कर्ज असलेल्या टॉप-१० देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचं समोर आलं होतं. कोरोना काळात पाकिस्तान डीएसएसआय म्हणजेच डेब्ट सर्व्हीस सस्पेंशन इनिशिएटीव्हच्या अखत्यारीत आला आहे. यामुळे पाकिस्तानला आता परदेशातून कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं असं नमूद करण्यात आलं होतं. पाकिस्तानला कर्जात बुडवण्यात इमरान खान सरकारचं मोठं योगदान असल्याचा आरोप केला गेला. 

दुसरीकडे कर्जात बुडालेला पाकिस्तान हा काही एकटाच देश नाही. वर्ल्ड बँकेचा अहवाल पाहायचा झाल्यास भारतासह विकसनशील आणि विकसीत देशांवर त्यांच्या जीडीपीचा एक मोठा हिस्सा कर्जाच्या स्वरुपात आहे. कर्ज घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, चीन, जापान सारख्या विकसीत देशांचीही नावं आहेत. 

देशाच्या एकूण जीडीपीचा एकूण किती मोठा हिस्सा कर्जाच्या स्वरुपात आहे अशा देशांमध्ये सर्वात अव्वल स्थानावर जपानचं नाव येतं. एकूण जीडीपीच्या तुलनेत जपानवर २५६.९ टक्के कर्ज आहे. त्यानंतर सूडान या आफ्रिकन देशाचा नंबर लागतो. ज्यावर २०९.९ टक्के इतकं कर्ज आहे. 

ग्रीसवर देशाच्या जीडीपीच्या तुलनेत २०६.७ टक्के इतकं कर्ज आहे. इरिट्रियावर १७५.१ टक्के, तर केप वर्देवर १६०.७ टक्के कर्ज आहे. यानंतर इटलीचा क्रमांक लागतो. ज्यावर १५४.८ टक्के इतकं कर्ज आहे. सूरीनाम देशावर देशाच्या जीडीपीच्या तुलनेत १४०.६ टक्के इतकं कर्ज आहे. बारबाडोसवर १३८.३ टक्के, मालदीवर १३७.९ टक्के आणि सिंगापूरवर १३७.२ टक्के इतकं कर्ज आहे. यासर्व देशांनंतर अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिकेवर देशाच्या जीडीपीच्या तुलनेत १३३.३ टक्के इतकं कर्ज आहे. तर भारतावर ९०.६ टक्के इतकं कर्ज आहे. पाकिस्तानवर ८३.४ टक्के आणि चीनवर ६८.९ टक्के इतकं कर्ज आहे. भारताची परिस्थिती पाकिस्तानच्या तुलनेत खूप चांगली आहे. 

टॅग्स :वर्ल्ड बँकचीनभारतपाकिस्तान