वॉशिंग्टन : चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ९.६ टक्के दराने घसरण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. कोविडच्या जागतिक साथीमुळे परिस्थिती गंभीर असून, १९८० आणि १९९१ मधील भारताच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा यंदा वाईट अवस्था असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दक्षिण आशियाला या साथीमुळे मोठ्या मंदीचा सामना करावा लागत असून, येथील अर्थव्यवस्था ७.७ टक्के दराने कमी होणार असल्याचे जागतिक बँकेने आपल्या अर्धवार्षिक अहवालामध्ये स्पष्ट केले आहे.
१९९१मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली होती. देशावरील कर्जाचे हप्प्ते चुकवण्यासाठी सरकारला सोने तारण ठेवून कर्जाऊ रक्कम उभारण्याची वेळ आली होती. यंदाची स्थिती त्यापेक्षा गंभीर असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. फिच या पतमापन संस्थेने अर्थव्यवस्था १०.५ टक्के घटण्याची शक्यता वर्तविली.
समस्या आणखी वाढणार, बुरे दिन सुरूच राहणार; जागतिक बँकेकडून धोक्याचा इशारा
दक्षिण आशियाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागत असून, येथील अर्थव्यवस्था ७.७ टक्के दराने कमी होणार असल्याचे जागतिक बँकेने आपल्या अर्धवार्षिक अहवालामध्ये स्पष्ट केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 02:21 AM2020-10-09T02:21:22+5:302020-10-09T06:52:02+5:30