२ एप्रिल २०११ चा दिवस तुम्हाला आठवतोय का? धोनीनं षटकार ठोकला आणि २८ वर्षांची प्रतीक्षा संपली. भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला. यंदा भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा विश्वचषक भारताकडेच येईल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.दरम्यान, या विश्वचषक स्पर्धेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर (World Cup's Financial Impact) खूप सकारात्मक परिणाम होईल. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत १.५ अब्ज डॉलर्सची वाढ होईल, असं बीक्यू प्राईमनं केलेल्या रिसर्चमधून समोर आलंय.कशी काढली आकडेवारीविमान भाडे, हॉटेल्स, स्टेडियमची तिकिटे, देशांतर्गत आणि परदेशी प्रवाशांचा इंटरसिटी प्रवास यावरील खर्चाचा थेट आर्थिक परिणामामध्ये समावेश होतो. यामध्ये बीसीसीआयनं भारताच्या पायाभूत सुविधांवर आणि कार्यक्रमांसाठी नूतनीकरणासाठी केलेल्या खर्चाचाही समावेश आहे. याशिवाय पर्यटकांनी पर्यटनावर खर्च केलेला पैसाही अर्थव्यवस्थेचा भाग बनणार आहे. हा अप्रत्यक्ष आर्थिक परिणाम आहे.५ शहरांमध्ये होणाऱ्या सामन्यातील एका व्यक्तीचा सरासरी खर्च काढण्यात आलाय. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादचा समावेश आहे. नंतर या सरासरी खर्चाचा वापर, मॅच व्हेन्यू असलेल्या अन्य शहरांच्या प्रति व्यक्ती खर्चाला काढण्यासाठी करण्यात आलाय. अहमदाबादचा या पहिल्या ५ शहरांमध्ये समावेश करण्यात आला आहे, कारण येथे २ हायप्रोफाईल सामने होणार आहेत. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आणि फायनलचा समावेश आहे.
किती लोक होणार सहभागीसर्व स्टेडियममधील सर्व जागा भरल्या जातील असं गृहीत धरलं तर विश्वचषक सामन्यांसाठी प्रेक्षकांची एकूण संख्या २४.८ लाखांवर पोहोचते. गेल्या दोन विश्वचषकांच्या आकडेवारीच्या आधारे २० टक्के परदेशी आणि ८० टक्के देशातील प्रेक्षक असतील असं मानू. एखाद्या व्यक्तीचा मुख्य खर्च हवाई भाडं, हॉटेल्स, स्टेडियम फी, खाणं-पिणं, इंटरसिटी ट्रांझिट आणि पर्यटन यावर असेल.
विमानाचं भाडंयामध्ये एका शहरातून दुसऱ्या शहराच्या राऊंड ट्रिपच्या खर्चाचा समावेश करण्यात आलाय. या ट्रिपची किंमत हाय-प्रोफाइल सामन्यांच्या दिवसांसाठी मोजली गेली आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या खर्चाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. त्याचा भारतीय विमान कंपन्यांना फायदा होणार नाही.
हॉटेल स्टेत्याची गणना विश्वचषकादरम्यान तीन, चार आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये एका रात्रीच्या दराच्या आधारे करण्यात आली आहे. तर स्टेडियमच्या खर्चात सर्व शहरांतील एका मॅचच्या तिकिटाच्या किंमतीचा समावेश आहे.जेवणाचा खर्चयामध्ये थ्री, फोर आणि फाइव्ह स्टार रेस्तराँमध्ये दिवसाला तीन वेळच्या खाण्यापिण्याच्या किंमतीचा समावेश आहे. यामध्ये दिवसातून दोन वेळचे जेवण हे एव्हरेज मील मानलं जातं आणि दिवसातून एक वेळ खाणं हे लो कॉस्ट मील मानलं जातं.इंटरसिटी ट्रॅव्हलयामध्ये विमानतळ ते स्टेडियमपर्यंतच्या राउंड ट्रिपच्या खर्चासह ३५० रुपयांच्या अतिरिक्त प्रवास खर्चाचा समावेश आहे.डायरेक्ट इम्पॅक्टहे सर्व खर्च जोडून मिळालेला नंबर हा प्रत्येक प्रेक्षकानं सामन्यावर केलेला खर्च मानला जाईल. यात शहरानुसार बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत असेल तर त्याला ३०,३०० रुपये खर्च करावे लागतील. जर कोणी मुंबईहून दिल्लीला जात असेल तर त्याला संपूर्ण टूरसाठी २९,६०० रुपये खर्च करावे लागतील.एका व्यक्तीचा सरासरी खर्चहोम सिटीएका प्रेक्षकाला त्याच्याच शहरात सामना पाहण्यासाठी एकूण ७,६०० रुपये मोजावे लागतील. म्हणजेच यातून एकूण ७५५ कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे.
इंटरसिटी आणि इंटरनॅशनलयामध्ये एका व्यक्तीचा सरासरी खर्च ३२,१०० रुपये आहे. १४.९ लाख इंटरसिटी आणि इंटरनॅशन प्रेक्षकांनुसार यात ४,७८१ कोटी रुपये जमा होतील.इनडायरेक्ट इम्पॅक्टपर्यटनयामध्ये केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये ते तिकिटाचा खर्च करून केवळ मॅच पाहण्यासाठी येणार नाही असं मानलं जात आहे. एका ट्रॅव्हल एजन्सीनं बीक्यू प्राइमशी शेअर केलेल्या डेटानुसार, भारतात येणारे परदेशी पर्यटक सरासरी ३० टक्के विमानभाडे आणि ७० पर्यटन आणि इतर खर्च करतात.
भारताव्यतिरिक्त, विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर ९ देशांच्या तुलनेत भारताचा 'सरासरी राउंड ट्रिप एअरफेअर खर्च' ६३,००० रुपये आहे. त्यामुळे उर्वरित ७० टक्के खर्च मोजला तर तो १.४७ लाख रुपये येतो. या ७० टक्क्यांमध्ये सामना पाहण्याचा थेट खर्च देखील समाविष्ट आहे, जो आधीच जोडण्यात आलाय. त्यामुळे एकूण अंदाजानुसार, एक आंतरराष्ट्रीय पर्यटक पर्यटनावर अप्रत्यक्षपणे १.१४ लाख रुपये खर्च करेल असा अंदाज आहे. यानुसार सर्व आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात होणाऱ्या विश्वचषकादरम्यान पर्यटनावर ५,७०५ कोटी रुपये खर्च करतील.
बीसीसीआयचा खर्चमीडिया रिपोर्ट्सनुसार मॅच आयोजित होणाऱ्या सर्व १० स्टेडियममध्ये बीसीसीआय ५० कोटींप्रमाणे ५०० कोटींचा खर्च करत आहे. तर टुरिझम आणि इन्फ्रातून ६२०० कोटींच्या इनडायरेक्ट फायनान्शिअल इम्पॅक्टचा अंदाज आहे.
विश्वचषकाचा आर्थिक परिणामविश्वचषक स्पर्धेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव अंदाजे ११,७५० कोटी रुपये आहे. एका अर्थशास्त्रज्ञानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की त्यांच्या अंदाजानुसार १५ टक्के अतिरिक्त खर्च येईल, जो स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या छोट्या वस्तूंवर खर्च केला जाईल. अशा प्रकारे, विश्वचषक २०२३ चा आर्थिक परिणाम १३,५०० कोटी रुपये असा अंदाज आहे.