नवी दिल्ली : क्रिकेटचे चाहते भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक क्रिकेटपटू तरुणांचे रोल मॉडेल आहेत. १९८७ नंतर यंदा पहिल्यांदाच सणासुदीचा काळ आणि क्रिकेट वर्ल्डकप एकाचवेळी आल्याने चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधीच ठरणार आहे. लोकांमधील ही क्रेझ एन्कॅश करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या आतापासून सज्ज झाल्या आहेत.
विमान भाड्यात वाढ
शहर वाढ
अहमदाबाद १५०-२००%
धर्मशाला ३००-४००%
लखनऊ ८०-१००%
हैदराबाद ६०-८०%
पुणे १२०-१५०%
चेन्नई ५०-६०%
बंगळुरु ४०-६०%
मुंबई ३०-६०%
नवी दिल्ली ५०-६०%
कोलकाता ४०-७०%
शहर वाढ सामने
हैदराबाद १९९% (३)
पुणे १६९% (५)
चेन्नई १६७% (५)
बंगळुरू १६६% (५)
मुंबई १५४% (५) नवी दिल्ली १४६% (५)
कोलकाता १०८% (५)
सणासुदीमुळे खरेदीला बूस्टर
n वर्ल्ड कपच्या जोडीला सणासुदीमुळे नागरिकांकडून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, टीव्ही, स्पीकर्स, वॉशिंग मशीन्स, वायरलेस हेडफोन आदींची जोरदार खरेदी सुरु केली आहे. या काळात लोक निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचे बेत आखत असतात.
n त्यामुळे जवळपास सर्वच मार्गावर हवाई प्रवास भाड्यात ३ ते ५ पटींनी वाढ झालेली दिसत आहे.