मुंबई : इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे ६ ते ८ आॅक्टोबर या काळात मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात दंतविषयक परिषद आणि दंतवस्तूंचे प्रदर्शन होणार असून, देश-विदेशातील डेंटिस्ट सहभागी होणार आहेत. याशिवाय भारतासह अनेक देशांतील दंतवस्तूंशी संबंधित १२० प्रदर्शक तिथे असतील. चीन, इस्रायल व तैवान या देशांची तिथे विशेष पॅव्हेलियन्सही असणार आहेत. आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी ही माहिती दिली.
जागतिक स्तरावर दंतचिकित्सेमध्ये जी तंत्रज्ञाने व तंत्रे येत आहेत, ती यानिमित्ताने सर्वांसमोर येतील. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर जे काही घडत आहे, ते या प्रदर्शन व परिषदेमुळे दंतचिकित्सेतील व्यावसायिक, तंत्रज्ञ व संबंधितांना समजू शकेल. देशातील तसेच चीन, जर्मनी, इस्राएल, मलेशिया, रशिया, दक्षिण कोरिया, तैवान, तुर्कस्थान, ब्रिटन व अमेरिकेतील तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शक यात सहभागी होणार आहेत. सुमारे २५० स्टॉल्समध्ये हे प्रदर्शक आपल्या दंतविषयक वस्तूंचे प्रदर्शन घडवतील. झपाट्याने वाढणारी भारतीय बाजारपेठ आघाडीच्या जागतिक दंतवस्तूंना व उत्पादनांना आकर्षित करीत आहे.
डॉ. अशोक ढोबळे म्हणाले, दंतवस्तू आणि दंत तंत्रज्ञानातील सर्वच गोष्टी इथे असतीलच; शिवाय ही शास्त्रीय परिषद आहे.दंतशल्यचिकित्सा क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ आधुनिक व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व थेराप्यूटिक प्रक्रिया यांवर परिषदेत बोलतील. दंतशल्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कार्यशाळा आणि व्यावहारिक अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
शुक्रवारपासून जागतिक दंतप्रदर्शन, मुंबईत येणार अनेक देशांचे स्टॉल्स
इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे ६ ते ८ आॅक्टोबर या काळात मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात दंतविषयक परिषद आणि दंतवस्तूंचे प्रदर्शन होणार असून, देश-विदेशातील डेंटिस्ट सहभागी होणार आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:17 AM2017-10-04T04:17:15+5:302017-10-04T04:17:49+5:30