मुंबई : जगाला सीमामुक्त व्यापाराची गरज असून देशादेशांमधील व्यापार अडथळे तातडीने दूर झाल्यास जागतिक आर्थिक विकासाचे दरवाजे उघडतील असा आशावाद अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.
जेटली यांच्याहस्ते जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या वार्षिक बैठकीचे सोमवारी मुंबईत उद्घाटन झाले. सीमा शुल्कातील चोरी रोखण्यासाठी नॅशनल ट्रेड फॅसिलिटेशन ऍक्शन प्लॅन सरकारने तयार केला आहे. त्यासंबंधी चार देशांशी भारत या बैठकीत करार करणार आहे. अॅडव्हान्स फॅसिलिटेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम अंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचेही जेटली म्हणाले.