नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. भारतातपेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या देशाच्या बर्याच भागांत एक लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोलचे (Petrol Price) दर वेगवेगळे आहेत. (world petrol prices most expensive in hong kong cheapest in venezuela in india 100 rs per litr)
अशा परिस्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की तुम्हाला जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल कोठे मिळेल? असे कोणते देश आहेत जेथे, पेट्रोल आणि डिझेल किंमत भारतापेक्षा जास्त आहे. तसेच, शेजारच्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत? तर मग जाणून घेऊया... जगातील प्रमुख देशांमधील पेट्रोलच्या किंमती...
सर्वात स्वस्त कोठे मिळते पेट्रोल?
पेट्रोलच्या किंमतींबद्दल बोलायाचे झाले तर व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात स्वस्त आहे. याठिकाणी एक लिटर पेट्रोलची किंमत 1.46 रुपये आहे. दुसर्या क्रमांकावर इराण आला आहे, येथे पेट्रोलची किंमत 4.24 रुपये आहे, तर अंगोलामध्ये पेट्रोल 17.88 रुपये आहे. हे तीन देश असे आहेत जिथे पेट्रोलचा दर पाण्यापेक्षा स्वस्त आहे. जर आपण बाजारात एक लिटर पाण्याची बाटली विकत घेतली तर ती 20 रुपयांना मिळते.
व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल स्वस्त का?
व्हेनेझुएला हा असा देश आहे जिथे जगात सर्वात स्वस्त पेट्रोल उपलब्ध आहे. दरम्यान, आर्थिक संकटाला तोंड देणार्या व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल इतके स्वस्त आहे, कारण जगात व्हेनेझुएलामध्ये सर्वात जास्त तेलाचा साठा आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतरही येथील सरकार इंधनावर अनुदान देते.
#ICICI च्या नेट बँकिंग ग्राहकांवर घोटाळे बाजांची नजर, पोलिसांकडून अलर्ट जारीhttps://t.co/HnvRWPwf0v#icicibank#cybercrime
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021
सर्वात महाग पेट्रोल कोठे विकले जाते?
ग्लोबल पेट्रोल डिझेल प्राइस.कॉम या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये पेट्रोल प्रति लिटर 169.21 रुपये आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये प्रति लिटर 150.29 रुपये, सीरियामध्ये प्रति लिटर 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये प्रति लिटर 140.90 रुपये, नॉर्वेमध्ये प्रति लिटर 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये 133.90 रुपये आहे. इंग्लंडमध्ये पेट्रोल प्रति लिटर 116 रुपये, स्वित्झर्लंडमध्ये प्रति लिटर 115 रुपये, जर्मनीमध्ये प्रति लिटर 116 रुपये, जपानमध्ये प्रति लिटर 93.62 रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये प्रति लिटर 68.91 रुपये आणि अमेरिकेत 50.13 रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, पेट्रोल सर्वात महाग असलेल्या देशांमध्ये भारत 58 व्या स्थानावर आहे.
#SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा https://t.co/Gqgg9XgYjs
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021
भारतात निवडणुकांमुळे दरवाढीत 18 दिवसांचा खंड
गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमुळे सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ 18 दिवस रोखून धरली होती. निवडणुका संपताच दरवाढ पुन्हा सुरू केली. 4 मेपासून आतापर्यंत 15 वेळा दरवाढ झाली असून, या काळात पेट्रोल 3.54 रुपयांनी, तर डिझेल 4.16 रुपयांनी महाग झाले आहे.
उत्पादन शुल्क आणि राज्यांचे व्हॅट
भारतात पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आले आहेत. पेट्रोलच्या किमतीतील 60 टक्के, तर डिझेलच्या किमतीतील 54 टक्के हिस्सा करात जातो. केंद्र सरकारकडून पेट्रोलवर प्रतिलिटर 32.90 रुपये, तर डिझेलवर 31.80 रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. याशिवाय राज्यांकडून दोन्ही इंधनांवर व्हॅट आकारला जातो. व्हॅटचा दर भिन्न असल्यामुळे प्रत्येक राज्यातील दर भिन्न असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात.