Lokmat Money > बिझनेस न्यूज > World Savings Day 2023: आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व

World Savings Day 2023: आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व

३० ऑक्टोबर जगभरात World Savings Day किंवा World Thrift Day म्हणून साजरा केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:35 PM2023-10-30T14:35:51+5:302023-10-30T14:36:44+5:30

३० ऑक्टोबर जगभरात World Savings Day किंवा World Thrift Day म्हणून साजरा केला जातो.

World Savings Day 2023 Start today from Thrift Day these 4 tasks Know its history importance | World Savings Day 2023: आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व

World Savings Day 2023: आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व

World Savings Day 2023: ३० ऑक्टोबर जगभरात World Savings Day किंवा World Thrift Day म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही आर्थिक नियोजनाचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. बचत करणं हा फायनान्शिअल प्लॅनिंगची पहिली पायरी असते. सध्याची स्थिती पाहता महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती उत्तम ठेवणं आवश्यत आहे. पाहूया आजच्या दिवसाबाबत महत्त्वाच्या  बाबी आणि जाणून घेऊ तुम्ही काय काय करू शकता.

काय आहे याचा इतिहास?
याची सुरुवात १९३४ मध्ये झाली. इटलीतील मिलान येथे २९ देश एकत्र आले आणि पहिली आंतरराष्ट्रीय बचत बँक काँग्रेस सुरू झाली. महामंदीनंतर जगभरातील अर्थव्यवस्था प्रभावित झाल्या, त्यानंतर लोकांमध्ये बचत आणि आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला जागतिक काटकसर दिन, थ्रिफ्टिंग म्हणजे कमी खर्च करणं या नावानं प्रस्तावित करण्यात आला. नंतर तो World Savings Day किंवा World Thrift Day या दोन्ही नावांनी साजरा केला जाऊ लागला.

तुम्ही काय करू शकता?

  • तुम्ही बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं पाऊल टाकू शकता. तुमच्याकडे सेव्हिंग अकाऊंट नसेल तर ते सुरू करा.
  • किमान छोटी गुंतवणूक सुरू करा. मोठ्या गुंतवणूकीपासूनच सुरुवात करायची असं काही आवश्यक नाही. पोस्ट ऑफिसमध्येही अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करू शकता. यामध्ये कमी रकमेच्या गुंतवणूकीतून चांगला निधी उभा करू शकता.
  • एसआयपी अशी गुंतवणूक आहे ज्यात कमी गुंतवणूकीचा पर्याय मिळतो. या ठिकाणी चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते.
  • तुमच्या मुलांना सेव्हिंग आणि काटकसर असे गुण शिकवा. लहानपणापासूनच त्यांच्यात हे गुण असणं गरजेचं आहे. त्यांना हे गुण शिकवण्यासाठी आपल्यातही हे गुण आणणं आवश्यक आहे.

Web Title: World Savings Day 2023 Start today from Thrift Day these 4 tasks Know its history importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.