तन वर्षांनी जुळला योग : दक्षिण अफ्रिकेला ४ थे विश्व साहित्य संमेलनपुणे : मराठी साहित्याला जगभरात पोहचविणार्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या परंपरेला गेली तीन वर्ष खंड पडला होता. मात्र यंदा हा योग जुळून आला आहे. दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे हे संमेलन होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मराठी विश्व साहित्य संमेलन हा कायमच चर्चेचा मुद्दा ठरतो. तीन वर्षांपूर्वी कॅनडातील टोरोंटो येथे आयोजित विश्व साहित्य संमेनानिमित्त मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या वादाचे परिणाम पुढील दोन वर्षेही महामंडळाला भोगावे लागले. त्या संमेलनाला महामंडळाचा एकही सदस्य नसल्याने ते संमेलन विश्व साहित्य संमेलन म्हणून रद्द करण्यात आले होते. त्यामुळे त्या वर्षी देखील विश्व संमेलन झाले नाही. त्यानंतर पुढील दोन वर्षे संमेलनासाठी जगातून निमंत्रणेच आली नाहीत. मात्र यंदा अंदमान निकोबार तसेच दक्षिण आफ्रिका या दोन ठिकाणाहून निमंत्रणे वैैयक्तिक पातळीवर आली. यातील अंदमानचे निमंत्रण देशांतर्गत असल्याने तो पर्याय वगळून दक्षिण अफ्रिकेचे निमंत्रण स्वीकारण्यात आले आहे. स्थळ निवड समितीत शुभदा फडणवीस, कौतिकराव ठाले पाटील, उषा तांबे व महामंडळाचे तिन्ही पदाधिकारी अध्यक्षा वैैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन होते. दक्षिण अफ्रिकेतील मराठी मंडळ व उत्कर्ष प्रोजेक्टस्चे राजू तेरवाडकर यांचे निमंत्रण आले आहे. संमेलन मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल असेही वैद्य यांनी सांगितले. टोरांटो संमेलनाध्यपदी महामंडळाने ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड केली होती. यंदाच्या संमेलनाला तेच संमेलनाध्यक्ष होणार का असा सवाल साहित्य विश्वातून होत आहे. परंतु तशी आमची इच्छा असली तरी हा निर्णय नंतर घेण्यात येईल अशी भूमिका वैद्य यांनी मांडली. ---
अखेर वाजणार विश्व संमेलनाची तुतारी
तीन वर्षांनी जुळला योग : दक्षिण अफ्रिकेला ४ थे विश्व साहित्य संमेलन
By admin | Published: July 1, 2014 09:43 PM2014-07-01T21:43:34+5:302014-07-01T21:43:34+5:30