Join us  

जागतिक घडामोडी, नफा कमविण्यामुळे बाजार घटला

By admin | Published: July 11, 2016 4:28 AM

ब्रेक्झिटच्या निर्णयामुळे आलेली अनिश्चितता, इटली मधील बॅँकांमध्ये निर्माण झालेली समस्या या अनिश्चित आंतरराष्ट्रीय वातावरणाच्या जोडीलाच नफा कमविण्यासाठी झालेली विक्री

प्रसाद गो. जोशीब्रेक्झिटच्या निर्णयामुळे आलेली अनिश्चितता, इटली मधील बॅँकांमध्ये निर्माण झालेली समस्या या अनिश्चित आंतरराष्ट्रीय वातावरणाच्या जोडीलाच नफा कमविण्यासाठी झालेली विक्री आणि गुंतवणुकदारांची सावध भूमिका यामुळे मुंबई शेअर बाजारातील तेजी लोप पावली. सप्ताहाच्या अखेरीस बाजार काहीसा घसरून बंद झाला. परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या विक्रीचाही फटका बाजाराला बसला.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात केवळ चारच दिवस व्यवहार झाले. बुधवारी ईदमुळे बाजार बंद होता. सप्ताहभरात सेवा क्षेत्राच्या समभागांनाही गतसप्ताहात मोठा फटका बसल्याने हा निर्देशांकही खाली आलेला दिसून आला.ब्रेक्झिटमुळे काय काय परिणाम होऊ शकतात हे अद्यापही पुढे येत नसल्याने याबाबत अनिश्चित वातावरण आहे. त्यातच इटली मधील बॅँकांसमोरचे संकट आणखी कठीण होत आहे. यामुळे संपूर्ण युरोपच नव्हे तर जगच चिंतेत आहे. साहजिकच जगभरातील शेअर बाजारांमध्ये याचे पडसाद उमटले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारही खाली येण्यास प्रारंभ झाला आहे. गतसप्ताहामध्ये वाढलेल्या किंमतींमुळे नफा कमविण्याची चालून आलेली संधी गुंतवणुकदारांनी सोडली नाही. त्या जोडीलाच परकीय वित्तसंस्थांनीही २५३.१२ कोयी रुपयांचे समभाग विकून बाजारातील मंदी आणखी गडद केली. असे असले तरी बाजारामध्ये झालेली घट ही फारच किरकोळ आहे. रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरामध्येही गतसप्ताहात फारसा फरक न झाल्याने रुपयाचे मूल्य स्थिर राहिले.एचएसबीसी या जागतिक आर्थिक सेवा संस्थेने आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर काहीसा कमी (७.४ टक्के) राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा बाजाराची काळजी वाढविणारी ठरली.