World First SMS, Text Message: जगातील पहिला टेक्स्ट मेसेज (SMS) 1992 साली पाठवण्यात आला होता, हा मेसेज एका व्होडाफोन कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. या मेसेजमध्ये कर्मचाऱ्याने मेरी ख्रिसमस असे लिहिले आहे, आता या अनोख्या आणि पहिल्या एसएमएसचा लिलाव होणार आहे. एसएमएसच्या लिलावानंतर किंमत £170,000 (जवळपास 1 कोटी 71 लाख रुपये) असू शकते.
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जगातील पहिला एसएमएस ब्रिटिश प्रोग्रामर नील पापवर्थ (Neil Papworth) यांनी 29 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी पाठवला होता. आता मोबाईल कंपनी व्होडाफोनने या एसएमएसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसएमएसच्या डिजिटल प्रतीचा पॅरिसमधील अगुटेस ऑक्शन हाऊस (Paris auction house Aguttes) येथे लिलाव केला जाईल. हा लिलाव 21 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे.
FOR SALE: World’s first text message 💬, 1992 #NFT
— Vodafone UK (@VodafoneUK) December 14, 2021
Used once, over 14 characters, festive theme 🎄
To be auctioned 21/12 with proceeds going to @UNHCRUK 👇
नील पापवर्थ एक डेव्हलपर आणि टेस्ट इंजिनिअर म्हणून काम करत होते, त्यावेळी त्यांनी कॅम्प्युटरवरून हा एसएमएस त्यांचे दुसरे सहकारी रिचर्ड जार्विस (Richard Jarvis) यांना पाठवला होता. तेव्हा रिचर्ड जार्विस हे कंपनीचे संचालक होते. हा एसएमएस त्यांना ऑर्बिटल 901 हँडसेटवर ( Orbitel 901 handset) पाठवण्यात आला होता.
Did you know the world's #1stSMS was a simple "Merry Christmas"?
— Vodafone Foundation (@VodafoneFdn) December 14, 2021
Sent 30 years ago via the #Vodafone network, it's been transformed into a #NFT by @vodafone_de, so it can be auctioned to raise funds for our partners at #UNHCR, helping to build a better future for @refugees. pic.twitter.com/NDis7WEHxC
जेव्हा 1992 मध्ये एसएमएस पाठवण्यात आला होता. तेव्हा तो इतका लोकप्रिय होईल, याची कल्पनाही नव्हती, असे नील पापवर्थ यांनी 2017 मध्ये सांगितले होते. तसेच, त्यांनी आपल्या मुलांनाही सांगितले होते की, मी जगातील पहिला मेसेज पाठवला होता.
लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेचे काय करणार?
दरम्यान, व्होडाफोनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लिलावातून जी काही रक्कम मिळेल ती यूएनएचसीआर- यूएन रिफ्यूजी एजन्सीला दिली जाईल. विशेष म्हणजे 1992 मध्ये पहिला मेसेज पाठविण्यात आला होता. यानंतर 1995 पर्यंत, दरमहा सरासरी केवळ 0.4 टक्के लोक मेसेज पाठवत होते.