जगभरातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांनी नुकतेच भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. मोदींसह फिंक यांनी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या भारताच्या मुकेश अंबानींचीही भेट घेतली. फिंक यांना अमेरिकेच्या उद्योग विश्वातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. भारत दौऱ्यावर मुकेश अंबानी आणि फिंक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचे समजते. ब्लॅकरॉक ही शाईच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी असेच मॅनेजर कंपनी आहे.
कंपनीचा जूनच्या तिमाहीतील असेट अंडर मॅनेटमेंट ९.४३ ट्रिलियन डॉलर एवढं आहे. विशेष म्हणजे ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या तीन पट आणइ अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मी आहे. त्यावरुन, ब्लॅकरॉक कंपनीच्या आर्थिक उलाढालीचा अंदाज लावता येईल. जगभरातील एकूण शेअर्स आणि बॉन्डस पैकी १० टक्के हिस्सा या कंपनीचा आहे, यावरुनही कंपनीच्या आर्थिक ताकदीचा अंदाज लावता येऊ शकतो. ही कंपनी म्हणजे जगातील सर्वात मोठी शॅडो बँक आहे. जगातील विविध क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही या कंपनीचा एक भाग आहेत.
लॅरी फिंक यांनी भारत दौऱ्यावर मुंबईतील बीकेसीमधील रिलायन्स रिटेल हबचा दौरा केला. तसेच, रिलायन्सच्या सिनीयर लीडरशीपसोबतही चर्चा केल्याचं समजते. जुलै महिन्यात फायनान्सियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉकने एक जॉईंट वेंचरची घोषणा केली होती. त्यावेळी, भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणुकदारांपैकी ब्लॅकरॉक एक असल्याचं फिंक यांनी रिलायन्सच्या एजीएममध्ये म्हटलं होतं. कंपनीकडून डिजिटल फर्स्ट असेट मॅनेजर लाँच करण्याची योजना आखण्यात येत आहे. भारत हा बदलत्या डिजिटल स्थित्यंतरातून जात आहे.
ब्लॅकरॉक भारतामध्ये इन्वेस्टिंग, ऑपरेशन्स, एनालिटिक्स आणि कॉरपोरेट फंक्शंसमध्ये काम करत आहे. सध्या कंपनीचे भारतात २४०० कर्मचारी आहेत. कंपनी आशियामध्ये ४२२ अब्ज डॉलरचे असेट मॅनेज करत आहे. त्यापैकी, १५ टक्के असेट भारतात आहे. तसेच, कंपनीच्या ग्लोबल क्लाइंट्सची भारतात १३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. कोरोना महामारीनंतर देशात रिटेल इन्वेस्टर्सची संख्या वेगाने वाढली आहे. ही संख्या ३.६ कोटींवर पोहोचली आहे. रिलायंसचे लक्ष्य या गुंतवणुकदांरावंर आहे.