Join us  

जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप

By admin | Published: April 06, 2017 3:54 PM

एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओचा आणखी एक धमाका

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4G सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4G सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार,  Foxconn कंपनी हे लॅपटॉप बनवणार आहे. 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले यामध्ये असणार तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरा असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.  
 
सिमकार्डप्रमाणे Jio DTH लाही वेलकम ऑफर! -
 
भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्यास सज्ज आहे.  कंपनी आता DTH सर्विस सुरू करणार असून या महिन्यातच सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याचं वृत्त आहे. 
 
 
सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  वेलकम ऑफरमध्ये प्रमोशन करण्यासाठी कंपनी 90 दिवस सर्विस फ्री देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ग्राहकांना सर्विस आवडल्यानंतरच त्यांच्याकडून पैसे आकारले जातील असं म्हटलं जात आहे. जिओ आपल्या  DTH सर्विससाठी महिन्याला 180 ते 200 रूपये आकारण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 HD चॅनलसह 300 चॅनल पाहता येतील अशी माहिती आहे.  
 
यापुर्वीही जिओ सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता लीक झालेल्या फोटोंमुळे जिओच्या DTH सर्विसबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.  जिओ IP  आधारित टीव्ही सर्विस सुरू कऱणार असल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या सेट टॉप बॉक्सच्या रिमोटमध्ये माईकचं बटन दिसत आहे त्यामुळे यामध्ये व्हॉइस कमांड देण्याचा पर्याय असण्याची शक्यता आहे.