नवी दिल्ली : रिलायन्स जिओला आणखी आवश्यक तेवढे आंतरजोडणी पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गरज असल्यास त्यांची संख्या वाढविली जाईल, असे बीएसएनएलने म्हटले आहे. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. आंतरजोडणी पॉइंटवरून जिओचा अन्य दूरसंचार कंपन्यांशी वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीएसएनल जिओच्या मदतीला धावली आहे. ही मागणी जिओने केली नाही, असे श्रीवास्तव म्हणाले.
जिओला आणखी आंतरजोडणी पॉर्इंट देणार
By admin | Published: September 19, 2016 5:08 AM