ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - या वर्षी 5 अशे नवे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत जे स्मार्टफोनच्या बाजारात गेम चेंजर म्हणून समोर येऊ शकतात. Galaxy Note 7 फ्लॉप झाल्यानंतर सॅमसंग कंपनी फॅबलेट घेऊन येण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे 10 व्या वर्षात पदार्पण केलेला अॅपल iPhone 8 लॉन्च करणार आहे. याशिवाय गुगल सेकंड जनरेशन Pixel सोबत बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे.
जाणून घेऊया या स्मार्टफोन्समध्ये वेगळं असं काय आहे. यापैकी अनेक डिव्हाइसचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत त्या आधारे आम्ही ही माहिती देत आहोत.
iPhone 8: यावर्षी अॅपल आपलं 10 वं वर्ष साजरं करत आहे, त्यामुळे यंदा iPhone जरा वेगळा असणार आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iPhone7 मध्ये काही फिचर्स सोडले तर जास्त बदल करण्यात आला नव्हता. रिपोर्ट्सनुसार, iPhone 8 युनिबॉडी ग्लास असणार आहे. यावेळी होम बटन नसेल तर डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. याशिवाय वायरलेस चार्जिंग आणि OLED स्क्रीन असणार आहे.
Galaxy S8 Edge: Galaxy S8 Edge चे काही फोटो लीक झाले आहेत यानुसार S8 Edge मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मागच्या बाजूल असू शकतं. त्यामुळे होम बटन ऐवजी कंपनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आयरिस स्कॅनरसह नवीन असिस्टंट Bixby असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसरसह क्वॉड एचडी सुपर अॅमोलेड डिस्प्लेही असू शकतो. 29 मार्चला हा फोन लॉन्च होईल.
Nokia P1: नोकिया अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनसह पुन्हा एकदा बाजारात आहे. नोकियाच्या पहिल्या बजेट स्मार्टफोनच्या प्री बुकिंगने अनेक रेकॉर्ड तोडलेत. आता मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये कंपनी आपला हाय एंड स्मार्टफोन P1 सह धमाका करण्यास तयार आहे. लीक झालेल्या फोटोंवरून हा फोन Galaxy S8 ला टक्कर देऊ शकतं असं वाटतं. 27 फेब्रुवारीला हा फोन लॉन्च होऊ शकतो. म्हणजे 27 तारखेला Nokia P1 आणि 29 तारखेला सॅमसंग Galaxy S8 लॉन्च होईल. नोकियाच्या या फ्लॅगशिप डिवाइसमद्ये Snapdragon 835 सह Android 7.0 आणि अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे.
LG G6 : LG चा हा फोन ड्युअल रिअर कॅमेरा आणि ब्रश्ड मेटल डिझाइनमुळे आकर्षक दिसतोय. या फोनमध्ये विना बॉर्डरची स्क्रीन असू शकते. हा फोनदेखील मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Google Pixel 2nd Generation : यावर्षी फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये ड्युअल कॅमेरा सेटअपचं ट्रेंड असणार आहे. पिक्सेल लीक झालेल्या फोटोंमध्येही ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. याशिवाय गुगल पिक्सेलमध्ये कर्व्ड डिस्प्ले असू शकतो. या फोनमध्येही कमी बॉर्डर असलेली स्क्रीन असू शकते. अजूनपर्यंत पिक्सेलच्या स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती मिळालेली नाही. .