Join us

देशातील फटाके उद्योगाला यंदा

By admin | Published: November 09, 2015 12:05 AM

चिनी बनावटीच्या फटाक्यांवर आणि परवान्याशिवाय फटाकांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली असली तरी देशातील फटाकेनिर्मिती व्यवसायला यंदा जवळपास एक हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

तब्बल एक हजार कोटींचा तोटालखनौ : चिनी बनावटीच्या फटाक्यांवर आणि परवान्याशिवाय फटाकांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली असली तरी देशातील फटाकेनिर्मिती व्यवसायला यंदा जवळपास एक हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.उद्योगांची संघटना असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आॅफ इंडियाने (असोचेम) केलेल्या पाहणीत विनापरवाना फटाक्यांचे निर्माते, विक्रेते यांच्यावर केलेली कारवाई आणि चिनी फटाक्यांच्या आयातीवरील बंदी, असे उपाय सरकारने करूनही देशातील फटाके उद्योगाला दिलासा मिळालेला नाही, असे दिसले. ही पाहणी शिवकाशीसह १० महानगरांमधील फटाके निर्माते, ठोक व किरकोळ विक्रेत्यांमध्ये करण्यात आली. ठोक व किरकोळ विक्रेत्यांकडे चिनी बनावटीच्या फटाक्यांचा प्रचंड साठा असून अहमदाबाद, दिल्ली-एनसीआर, जयपूर, लखनौ, मुंबईसह देशभर बेकायदेशीरपणे ते विकले जात आहेत, पर्यायाने स्थानिक फटाके निर्मात्यांचे नुकसान होत आहे. देशातच फटाक्यांची मागणी ३५-४० टक्क्यांनी खाली आली असून, चिनी फटाक्यांची आयात बेकायदा होत असल्यामुळे देशी फटाके उद्योग एक हजार कोटी रुपयांचा तोटा सोसत आहे, असे असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी पाहणीचे निष्कर्ष जाहीर करताना म्हटले.