Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाऊस लांबल्याने यंदा स्टॉबेरीची आवक घटली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट

पाऊस लांबल्याने यंदा स्टॉबेरीची आवक घटली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट

नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्टॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला ४० टन स्टॉबेरीची आवक होत आहे. आठवडाभरापासून वाई, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्टॉबेरीची आवक केली जात असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:39 AM2017-11-26T03:39:12+5:302017-11-26T03:39:21+5:30

नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्टॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला ४० टन स्टॉबेरीची आवक होत आहे. आठवडाभरापासून वाई, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्टॉबेरीची आवक केली जात असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली.

This year, due to the delayed rainfall, the arrival of strawberries has reduced this year as compared to last year | पाऊस लांबल्याने यंदा स्टॉबेरीची आवक घटली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट

पाऊस लांबल्याने यंदा स्टॉबेरीची आवक घटली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट

- प्राची सोनवणे 

नवी मुंबई : नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्टॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला ४० टन स्टॉबेरीची आवक होत आहे. आठवडाभरापासून वाई, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्टॉबेरीची आवक केली जात असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. मात्र, पाऊस लांबल्याने यंदा स्टॉबेरीचे उत्पादन घटल्याने मागणी असून आवक कमी होत असल्याची माहिती दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्टॉबेरीच्या उत्पादनात घट झाल्याची माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाºयांनी दिली. पाऊस लांबल्याने तसेच परतीच्या पावसाने स्टॉबेरी उत्पादनावर परिणाम झाल्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्टॉबेरीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच स्टॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या आठवडाभरापासून वाशीतील एपीएमसी बाजारात स्टॉबेरीची आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढणार असून दरांमध्ये घट होणार नसल्याची प्रतिक्रिया व्यापºयांनी दिली. गतवर्षी ७२ टन स्टॉबेरीची आवक झाली होती. यंदा मात्र आवक घटली असून निम्म्यावर आली आहे.
थंडीचा हंगामा सुरू झाल्यापासून बाजारात स्टॉबेरीची आवक सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी वाढू लागली आहे. थंडीत स्टॉबेरीला रंगही चांगला येतो आणि गोडी अधिक असल्याने ग्राहकांसह व्यापाºयांकडून स्टॉबेरीला अधिक मागणी असते. महाबळेश्वरबरोबर वाई, पाचगणी, भिलारवाडी, सरकलवाडी आदी ठिकाणांहून स्टॉबेरीची बाजारात आवक होत आहे. नवी मुंबई परिसरातील आठवडे बाजारांमध्येही स्टॉबेरीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून महाबळेश्वर, जावली परिसरातील शेतकरी या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत. स्टॉबेरी नाशवंत असल्याने लवकरात लवकर बाजारात पोहोचविली तरच शेतकºयांना, व्यापाºयांना त्याचा फायदा होतो, अशी प्रतिक्रिया व्यापारी किसन मोरे यांनी दिली. आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड झालेल्या स्टॉबेरीला पावसाचा फटका बसल्याचेही मोरे यांनी सांगितले. रोपे पाण्याखाली गेल्याने त्याचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्टॉबेरीची किंमत प्रतिकिलो ६० ते १२० रुपये होती. यंदा ती ८० ते १७० रुपयांवर पोहोचली आहे. डिसेंबरमध्ये किती आवक होते, यावर अवकाळी पावसाचा किती फटका बसला, हे ठरणार आहे.

- वाई, महाबळेश्वर येथून आलेल्या स्टॉबेरीच्या चांगल्या दर्जाच्या दोन किलोंच्या बॉक्ससाठी २०० ते २५० रु पये, तर दुय्यम दर्जाच्या स्टॉबेरीसाठी १५० ते १८० रु पये मोजावे लागत आहेत.
- एपीएमसी घाऊक बाजारपेठेत ६००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल दराने स्टॉबेरी उपलब्ध आहेत. चांगल्या दर्जाच्या स्टॉबेरीचे दर हे दुय्यम दर्जाच्या स्टॉबेरीपेक्षा ४० ते ६० रुपयांनी जास्त आहेत.

Web Title: This year, due to the delayed rainfall, the arrival of strawberries has reduced this year as compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.