Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित

यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित

मुख्यमंत्र्यांनी अग्रिम बोनस देण्याचे आश्वासन दिल्यामुळे प्रचंड आर्थिक निकड असतानाही विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस घरी साठवला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 02:30 AM2016-01-26T02:30:53+5:302016-01-26T02:30:53+5:30

मुख्यमंत्र्यांनी अग्रिम बोनस देण्याचे आश्वासन दिल्यामुळे प्रचंड आर्थिक निकड असतानाही विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस घरी साठवला होता

This year the farmers are deprived of advance bonuses | यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित

यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित

अकोला : मुख्यमंत्र्यांनी अग्रिम बोनस देण्याचे आश्वासन दिल्यामुळे प्रचंड आर्थिक निकड असतानाही विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस घरी साठवला होता; परंतु अग्रिम बोनस नाही आणि खासगी बाजारात दरवाढही झालेली नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी संपूर्ण कापूस विकला आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांनी जवळपास १५ लाख ३० हजार क्विंटल क्षेत्रावर कपाशीची पेरणी केली होती. तथापि, कापसाचे उत्पादन जवळपास ५० टक्क््यांनी घटल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. गुजरात शासनाने शेतकऱ्यांना प्रतिक्ंिवटल ६०० रुपये बोनस दिल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी कापसाचा हमी दर ४१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे, पण भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने कापसाची प्रतवारी बघून प्रत्यक्षात ३८५० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल या दरानेच कापूस खरेदी केला.

Web Title: This year the farmers are deprived of advance bonuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.