Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा खाद्यान्न अनुदान ४ लाख काेटींहून कमी, गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात घट

यंदा खाद्यान्न अनुदान ४ लाख काेटींहून कमी, गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात घट

food subsidy : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केंद्र सरकार ८१ काेटींहून अधिक लाेकांना १ ते ३ रुपये प्रति किलाे या दराने धान्य पुरवठा करते. याशिवाय गरीब कल्याण याेजनेतून लाभार्थ्यांना माेफत खाद्यान्न पुरवठा करण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:53 AM2022-01-01T09:53:06+5:302022-01-01T09:53:39+5:30

food subsidy : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केंद्र सरकार ८१ काेटींहून अधिक लाेकांना १ ते ३ रुपये प्रति किलाे या दराने धान्य पुरवठा करते. याशिवाय गरीब कल्याण याेजनेतून लाभार्थ्यांना माेफत खाद्यान्न पुरवठा करण्यात येत आहे.

This year the food subsidy is less than 4 lakh girls, the subsidy is less than last year | यंदा खाद्यान्न अनुदान ४ लाख काेटींहून कमी, गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात घट

यंदा खाद्यान्न अनुदान ४ लाख काेटींहून कमी, गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात घट

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारचे खाद्य अनुदान ४ लाख काेटी रुपयांपेक्षा थाेडे कमी राहणार असल्याची माहिती खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात काही प्रमाणात घट राहणार आहे. 

पांडे यांनी सांगितले, की अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सुमारे २.२५ लाख काेटी रुपयांचे अनुदान राहणार आहे. तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न याेजना लागू करण्यासाठी अतिरिक्त १.४७ लाख काेटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा आकडा ३ लाख ७२ हजार काेटी रुपयांपर्यंत जाताे. गेल्या वर्षी ५.२९ लाख काेटी रुपये खाद्य अनुदान हाेते.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केंद्र सरकार ८१ काेटींहून अधिक लाेकांना १ ते ३ रुपये प्रति किलाे या दराने धान्य पुरवठा करते. याशिवाय गरीब कल्याण याेजनेतून लाभार्थ्यांना माेफत खाद्यान्न पुरवठा करण्यात येत आहे. या याेजनेला सध्या मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत ५० काेटींहून अधिक जणांना लाभ मिळाला आहे तर ३३ हजार काेटी रुपयांहून अधिक अनुदान देण्यात आले आहे.

मोफत खाद्यान्न योजनेला मुदतवाढ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केंद्र सरकार ८१ काेटींहून अधिक लाेकांना १ ते ३ रुपये प्रति किलाे या दराने धान्य पुरवठा करते. याशिवाय गरीब कल्याण याेजनेतून लाभार्थ्यांना माेफत खाद्यान्न पुरवठा करण्यात येत आहे. या याेजनेला सध्या मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: This year the food subsidy is less than 4 lakh girls, the subsidy is less than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा