मुंबई : महाराष्ट्र सरकार यंदा १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.‘आयएसीसी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने ५.९६ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांची योजना आखली आहे. सरकारने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे पायाभूत सेवा निर्मिती क्षेत्रातील नेता अशी बिरुदावली नीति आयोगाने राज्याला दिली आहे. राज्यात सर्वच क्षेत्रांत व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. स्मार्ट सिटी पुढाकारातून ऊर्जा, ग्रीड आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी पोषक वातावरण आहे. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा तब्बल १५ टक्के आहे. २0१७ वित्तवर्षात देशात आलेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ५३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्राने आकर्षित केली. महाराष्ट्र सरकारने व्यवसाय करणे अधिक सुलभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या आहेत. त्याचा हा परिणाम आहे. उद्योग आणि व्यवसायांस सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपले सरकार बांधील आहे, असेही फडणवीस म्हणाले.फिक्कीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या पुरोगामी महाराष्टÑ शिखर परिषदेत फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या विकासकामांमुळे महाराष्टÑाची अर्थव्यवस्था १ लाख कोटींची होण्याच्या मार्गावर आहे.फडणवीस म्हणाले, थेट परकीय गुंतवणुकीबाबत दिल्ली, कर्नाटक व गुजरात यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी तीव्र स्पर्धा राहत आली आहे. २0१६-१७ मध्ये मात्र महाराष्ट्राने या राज्यांवर मात करून देशातील अर्ध्यापेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक खेचून घेण्यात यश मिळविले.>कायमच आघाडीवरयंदाच्या शिखर परिषदेचा विषयच ‘महाराष्ट्र २0२५ : एक लाख कोटी अर्थव्यवस्थेच्या दिशेने झेप’ असा आहे. फडणवीस म्हणाले की, उद्योग आणि व्यवसायाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. अनेकदा महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या स्थानाला धोका निर्माण झाला, आव्हान मिळाले, अनेकदा काही प्रमाणात तडजोड करावी लागली. तथापि, गेल्या तीन वर्षांत आम्ही राज्याला पुन्हा पहिल्या क्रमांकावर घेऊन येण्यात यशस्वी ठरलो आहोत.
यंदा महाराष्ट्रात १ लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प, राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:12 AM