नवी दिल्ली : वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव असून गुरुवारी होणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर विचार होऊ शकतो.
सध्या कर्मचारी पेन्शन योजनेतहत (ईपीएस-९५) येणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचारी वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पेन्शन योजनेत अंशदान करू शकतात. त्यानंतर ते पेन्शनचा दावा करू शकतात. पेन्शन कार्यवाही समितीने (पीआयसी) पेन्शनसाठी वयोमर्यादा ६० वर्षे करण्याची शिफारस केली आहे, तसेच विमातज्ज्ञांना यासाठी एक प्रारूप विकसित करण्यास सांगावे, असेही या समितीने सूचित केले. जेणेकरून वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पीएफ सदस्यांना प्रोत्साहित करता येईल. वयोमर्यादा वाढविल्यास भविष्य निधीतील तूट कमी होईल. अल्पसेवा पेन्शन पात्रतेसाठीची वयोमर्यादाही ५० वरून ५५ वर्षे करण्याचाही या समितीचा प्रस्ताव आहे. यामुळे भविष्य निधीतील तूट १२,०२८ कोटींपर्यंत कमी होईल, असे या समितीचे म्हणणे आहे.
साठाव्या वर्षी पेन्शन?
वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव असून गुरुवारी होणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर विचार होऊ शकतो.
By admin | Published: February 16, 2015 12:33 AM2015-02-16T00:33:17+5:302015-02-16T00:33:17+5:30