नागपूर : पांढऱ्या आणि लाल तिळाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तुलनात्मकरीत्या भाव घसरले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह आहे. ग्राहकांची खरेदी वाढली असून स्वस्ताईमुळे यंदा मकरसंक्रांतीत तिळाचा गोडवा वाढणार आहे.
आवक वाढली, भावात घसरण
देशात तिळाचे उत्पादन यंदा जास्त प्रमाणात झाल्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. परिणामी गतवर्षीच्या १३० ते १५० रुपयांच्या तुलनेत यंदा पांढऱ्या तिळाचे भाव ६० रुपयांनी घसरून इतवारी ठोक बाजारात दर्जानुसार ७० ते ९० रुपयांवर स्थिरावले आहेत.
व्यापाऱ्यांकडे गेल्यावर्षीचे तीळ मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. ठोकमध्ये पांढऱ्या तिळाचा एबी ब्रॅण्ड ८० रुपये किलो, मध्य प्रदेशातील खुले तीळ ७० ते ८२ रुपये, गुजरात येथील उत्तम दर्जाचे खुले तीळ ७६ रुपये, गोल्ड प्रीमियम दर्जाचे ९० रुपये भाव आहे.
नागपुरात लाल तिळाला जास्त मागणी असते. गुजरात येथील उत्तम दर्जाच्या लाल तिळाचे भाव प्रति किलो ९० ते ९५ रुपयादरम्यान आहेत. खुल्या मालाला चांगली मागणी आहे. गेल्यावर्षी उत्तम दर्जाच्या लाल तिळाचे भाव २३५ रुपयांपर्यंत गेले होते. यंदा मकरसंक्रांतीचा सण सामन्यांच्या खिशाला परवडणारा राहील, अशी माहिती इतवारी बाजाराचे समीक्षक चंदन गोस्वामी यांनी लोकमतशी बोलताना
दिली.
यंदा तिळाचा गोडवा वाढणार
पांढऱ्या आणि लाल तिळाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तुलनात्मकरीत्या भाव घसरले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह आहे
By admin | Published: January 8, 2016 03:02 AM2016-01-08T03:02:20+5:302016-01-08T03:02:20+5:30