Lokmat Money > बिझनेस न्यूज > संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल?

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल?

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष असेल. देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून देशभरातील सहा शहरांमध्ये हा प्रयोग वर्षाच्या सुरुवातीलाच केला जाणार आहे. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:05 PM2022-01-10T17:05:43+5:302022-01-10T17:06:21+5:30

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष असेल. देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून देशभरातील सहा शहरांमध्ये हा प्रयोग वर्षाच्या सुरुवातीलाच केला जाणार आहे. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश आहे.

This year, which has revolutionized the field of communication, what will be the download speed? | संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल?

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल?

विनय उपासनी

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष असेल. देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून देशभरातील सहा शहरांमध्ये हा प्रयोग वर्षाच्या सुरुवातीलाच केला जाणार आहे. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश आहे.

५जी नेटवर्क म्हणजे नेमके काय?
मोबाइल नेटवर्कमधली पाचवी पिढी म्हणजे ५जी.
ते वायरलेसचे नवे जागतिक परिमाण आहे. याआधी १जी, २जी, ३जी आणि ४जी नेटवर्क होते/आहेत.
५जीचा शोध कोणी एकट्यादुकट्याने लावलेला नसून मोबाइल क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनीच सततच्या प्रयत्नांतून ५जी तंत्रज्ञान विकसित केले.

संपर्कक्रांती होणार
n ५जीमुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.
n  इंटरनेट वेगवान झाल्यास डाऊनलोडिंग कमीतकमी वेळात करता येणार आहे.
n विनाअडथळा संपर्क साधता येणार आहे.

आपल्यासाठी कशी असेल सेवा? 
n ५जी उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला किती इंटरनेट स्पीड मिळेल, असा प्रश्न सर्वांनाच आहे. ते जाणून घेण्याआधी आपल्याला 5जी कसे काम करते हे पाहावे लागेल. 
n ५जी लो, मिडियम, हाय अशा तीन बँडमध्ये काम करेल. सर्वसामान्यांसाठी लो बँडचा वापर होऊ शकतो कारण प्रचंड इंटरनेट स्पीडची त्यांना गरज नसते. हा स्पीड जास्तीत जास्त १०० एमबीपीएस एवढा असू शकेल. 
n लो बँडमुळे दूरपर्यंत नेटवर्क उपलब्ध करून देता येते आणि शिवाय इंटरनेट स्पीडही ठिकठाक मिळतो. त्यामुळे याचा वापर होऊ शकतो. 

भारतात या १३ शहरांमध्ये ५जी सेवा

चंडीगड, नवी दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, जामनगर, गांधीनगर, मुंबई, पुणे, कोलकाता,अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू

कोणत्या देशात किती जाळे?

स्वीडन
२३  

६०%
जगात २०२६ पर्यंत ५जी नेटवर्क पोहोचलेले असेल आणि ३५० कोटी लोक याचा वापर करत असतील, असा एरिक्सनचा अंदाज आहे. 

(लेखक लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत)

Web Title: This year, which has revolutionized the field of communication, what will be the download speed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.