मुंबई : देशातील प्रमुख आयआयटी संस्थांत २0२0-२१च्या तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी बड्या कंपन्यांच्या इंटर्नशिप प्रस्तावात वाढ झाली आहे. यंदा इंटर्नशिपचा आकडा गेल्या वर्षापेक्षा अधिक एप्रिलपर्यंत त्यात आणखी वाढ होईल. आनंदाची एक बाब अशी की, कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छात्रवृत्तीतही (स्टायपेंड) दुप्पट वाढ झाली आहे. चार प्रमुख आयआयटी संस्थांमधील यंदाची सर्वांत मोठी मासिक छात्रवृत्ती २.५ रुपयांची ठरली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक रकमेची छात्रवृत्ती आहे, असे सांगण्यात आले.
एका विद्यार्थ्याने सांगितले की, आयआयटी खरगपूरला ५१0 इंटर्नशिप प्रस्ताव गेल्या आठवड्यापर्यंत मिळाले आहेत. आणखी काही कंपन्यांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. इंटर्नशिपचा दुसरा टप्पा पुढील सत्रापासून सुरू होईल. गेल्या वर्षी दोन्ही सत्रांचे मिळून संस्थेला ४६१ इंटर्नशिप प्रस्ताव मिळाले होते. यंदा पहिल्या सत्रातच यापेक्षा जास्त प्रस्ताव आले आहेत.
इंटर्नशिपचे सत्र दरवर्षी आॅगस्टमध्ये सुरू होऊन एप्रिलपर्यंत चालते. २0२0-२१ चे इंटर्नशिप प्रस्ताव ‘प्री-प्लेसमेंट आॅफर्स’मध्ये (पीपीओ) रूपांतरित होतील, अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे. पीपीओंची संख्या पुढील वर्षात आणखी वाढलेली असेल, असे आयआयटी-दिल्लीच्या विद्यार्थ्याने सांगितले.
कानपूर आयआयटीच्या विद्यार्थी समन्वयकाने सांगितले की, यंदा इंटर्नशिपसाठी आम्ही अधिक कंपन्यांपर्यंत पोहोचत आहोत. अनेक नियमित संस्थांनी इंटर्नशिपची संख्याच वाढविली नाही, तर विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया छात्रवृत्तीमध्येही वाढ केली आहे.
>आताच ३५३ प्रस्ताव
कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्याने सांगितले की, गेल्या वर्षी संपूर्ण वर्षात ३५३ इंटर्नशिप प्रस्ताव आले. यंदा आतापर्यंतच ३११ प्रस्ताव आले आहेत. एका प्रस्तावात मासिक २.५ लाख रुपयांचे पॅकेज एका कंपनीने देऊ केले आहे. आधी ६0 हजारांपर्यंत मासिक छात्रवृत्ती देणाºया कंपन्या यंदा १.१५ लाखांपर्यंत मासिक छात्रवृत्ती देत आहेत. एप्रिलपर्यंत प्रस्ताव आणि छात्रवृत्ती या दोन्हींतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
आयआयटीच्या इंटर्नशिप प्रस्तावात यंदा मोठी वाढ
देशातील प्रमुख आयआयटी संस्थांत २0२0-२१च्या तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी बड्या कंपन्यांच्या इंटर्नशिप प्रस्तावात वाढ झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:41 AM2019-11-13T03:41:58+5:302019-11-13T03:42:13+5:30