न्यूयॉर्क : चालू आर्थिक वर्षात (२०१७-२०१८) भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्के असण्याची शक्यता असल्याचे नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी म्हटले. त्याच वेळी देशात ‘चांगले रोजगार’ निर्माण करणे, हे मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी मान्य केले.
चालू आर्थिक वर्षात आम्ही किमान ७.५ टक्के विकास दर गाठू व शेवटच्या तिमाहीत तर आम्ही बहुधा ८ टक्क्यांना स्पर्श करू, परंतु सरासरी हा दर ७.५ टक्के असेल, असे पनगढिया वृत्तसंस्थेशी येथे बोलताना म्हणाले.
पनगारिया यांनी संयुक्त राष्ट्रांच्या उच्च पातळीवरील राजकीय सभेला ‘व्हॉलुंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट आॅन इम्प्लिमेंटेशन आॅफ सस्टेनेबेल डेव्हलपमेंट गोल्स,
२०१७’ अहवाल गेल्या आठवड्यात येथे सादर केला. पनगढिया म्हणाले की, ‘देशात रोजगारांची निर्मिती करणे (विशेषत: खालच्या व निमकौशल्य पातळीवर) हे ८ टक्के विकास दर गाठण्यापेक्षाही खरोखरच मोठे आव्हान आहे.’
या वर्षी जीडीपी ७.५ टक्के शक्य
चालू आर्थिक वर्षात (२०१७-२०१८) भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्के असण्याची शक्यता असल्याचे नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:29 AM2017-07-24T00:29:51+5:302017-07-24T00:29:51+5:30