लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : टायटन कंपनी आगामी ५ वर्षांत ३ हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यात इंजिनीअरिंग, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा विश्लेषण, विपणन आणि विक्री या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
टायटन कंपनीच्या एचआर-कॉर्पाेरेट प्रमुख प्रिया एम. पिल्लई यांनी सांगितले की, आगामी ५ वर्षांत १ लाख कोटींचा व्यवसाय करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. त्यासाठी ३ हजार नवे कर्मचारी भरण्यात येतील.