Lokmat Money > बिझनेस न्यूज > येस बँक:अनिल अंबानी यांची होणार चौकशी, सुभाष चंद्रा, गोयल, गहेलोत यांनाही पाचारण

येस बँक:अनिल अंबानी यांची होणार चौकशी, सुभाष चंद्रा, गोयल, गहेलोत यांनाही पाचारण

अनिल अंबानी यांनी सोमवारी चौकशीसाठी जाणे अपेक्षित होते. पण आज शक्य नसल्याचे अनिल अंबानी यांनी कळविले. त्यामुळे त्यांना पुढील तारखेला जावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:51 AM2020-03-17T05:51:26+5:302020-03-17T05:52:22+5:30

अनिल अंबानी यांनी सोमवारी चौकशीसाठी जाणे अपेक्षित होते. पण आज शक्य नसल्याचे अनिल अंबानी यांनी कळविले. त्यामुळे त्यांना पुढील तारखेला जावे लागेल.

Yes Bank: Anil Ambani to be probed, Subhash Chandra, Goel, Gehlot also summoned | येस बँक:अनिल अंबानी यांची होणार चौकशी, सुभाष चंद्रा, गोयल, गहेलोत यांनाही पाचारण

येस बँक:अनिल अंबानी यांची होणार चौकशी, सुभाष चंद्रा, गोयल, गहेलोत यांनाही पाचारण

मुंबई : येस बँकेचे संस्थापक व माजी चेअरमन राणा कपूर यांना अटक केल्यानंतर ईडीने रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल व एस्सेल गु्रपचे प्रमुख सुभाषचंद्र यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
अनिल अंबानी यांनी सोमवारी चौकशीसाठी जाणे अपेक्षित होते. पण आज शक्य नसल्याचे अनिल अंबानी यांनी कळविले. त्यामुळे त्यांना पुढील तारखेला जावे लागेल. राणा कपूर यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे.
त्या व्यवहारात अनिल अंबानी वा इतरांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. अनिल अंबानी यांच्या समूहाने येस बँकेकडून १२ हजार ८00 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. येस बॅँकेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणात कार्पोरेट कंपन्यांकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जाणार आहे. एस्सेल सूमहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा, जेट एअरवेजचा प्रमुख नरेश गोयल, इंडियाबुलचे प्रमुख समीर गहेलोत यांना समन्स बजाविले आहे. २० मार्चला त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाण्याची सूचना करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर याच्याकडे सुरु असलेल्या चौकशीमध्ये बॅँक डबघाईला येण्यास कार्पोरेट कंपन्यांना देण्यात आलेले हजारो कोटींची बेकायदेशीर कर्जे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गहेलोत यांनी ईडीकडून अद्याप कसल्याही प्रकारचा समन्स आला नसल्याचा दावा केला आहे.

एचडीआयएलने कर्ज घेऊ नच आधीचे कर्ज फेडले

येस बँकेने एचडीआयएलला एका गृह प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. पण त्या कंपनीने ते कर्ज त्यासाठी वापरलेच नाही आणि येस बँकेकडून आधी घेतलेले कर्ज या नव्या कर्जातून फेडले, असे उघडकीस आले आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव बँक घोटाळ्यातही एचडीआयएल कंपनी सहभागी आहे.
त्या बँकेने एकूण कर्जाच्या ७३ टक्के कर्ज एकट्या एचडीआयएलला दिले होते. येस बँक घोटाळ्यात डीएचएफएल कंपनीचे नाव आले आहे. एचडीआयएल व डीएचएफएल या वाधवा कुटुंबीयांच्याच कंपन्या आहेत.

येस बँकेने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत १८ हजार ६५४ कोटी रुपयांचा तोटा दाखविला आहे. येत्या आर्थिक वर्षातही हा तोटा कायम राहील. बँकेला आणखी १0 हजार कोटी रुपयांचे भांडवल मिळाले, तरच बँक तगू शकेल. बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत अनेकांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या. ही रक्कम ७२ हजार कोटी रुपये आहे. बँकेतील घोटाळ्याची कुणकुण लागताच ठेवीदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केली होती.

Web Title: Yes Bank: Anil Ambani to be probed, Subhash Chandra, Goel, Gehlot also summoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.