नवी दिल्लीः YES BANKच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक YES BANKच्या खातेदारांना 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. RBI आठवड्याभरात बँकेतून 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवू शकते. सद्यस्थितीत ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत आहेत. त्याहून अधिकची रक्कम ग्राहक काढू शकत नाही. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. सीबीआयनं वाढवली तपासाची मर्यादा, अनेक ठिकाणी टाकले छापेकेंद्रीय तपास यंत्रणा(CBI) ने Yes Bank प्रकरणात राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईतल्या DHFLच्या अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. CNN News18च्या सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतल्या अनेक ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले आहेत. सीबीआयनं आतापर्यंत जवळपास 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. छापा टाकलेल्या ठिकाणांमधली जास्त करून कार्यालयं ही मुंबईस्थित आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात
पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव
चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण
कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द
लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा