Join us

YES BANKच्या ग्राहकांनो घाबरू नका, लवकरच निर्बंध उठतील, SBIच्या अध्यक्षांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 11:13 AM

yes bank: खरं तर खातेदार येस बँकेच्या आपल्या पैशासंबंधी साशंक आहेत. खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचा वारंवार विश्वास निर्माण केला जातोय.

ठळक मुद्देYES BANKवर आरबीआयनं घातलेल्या निर्बंधानंतर ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्येक खातेदाराची खात्यातून पैसे काढण्याची गडबड आहे. दिल्लीतल्या YES BANKच्या एटीएममध्येही आता पैशांची चणचण भासू लागली आहे.सद्यस्थितीत YES BANKचे ग्राहक महिन्याभरात जास्तीत जास्त 50 हजार रुपये एटीएममधून काढू शकतात. बँकेकडून पैसे काढण्याचे मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः YES BANKवर आरबीआयनं घातलेल्या निर्बंधानंतर ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्येक खातेदाराची खात्यातून पैसे काढण्याची गडबड आहे. दिल्लीतल्या YES BANKच्या एटीएममध्येही आता पैशांची चणचण भासू लागली आहे. सद्यस्थितीत YES BANKचे ग्राहक महिन्याभरात जास्तीत जास्त 50 हजार रुपये एटीएममधून काढू शकतात. बँकेकडून पैसे काढण्याचे मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे येस बँकेच्या एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. खरं तर खातेदार येस बँकेच्या आपल्या पैशासंबंधी साशंक आहेत. खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचा वारंवार विश्वास निर्माण केला जातोय. येस बँकेला सावरण्यासाठी पुढे आलेल्या एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.  'आजतक'शी बोलताना रजनीश कुमार यांनी येस बँकेशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. येस बँकेच्या खातेदारांना रजनीश कुमार म्हणाले, लोकांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण या तात्पुरत्या स्वरूपातील अडचणी आहेत. खातेदार बँकेतून 50 हजार रुपये काढू शकतात. परंतु बँकेनं घातलेले निर्बंध हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येस बँकेत खातेदारांच्या पैशासंबंधी त्यांनी निश्चित राहण्याची आवश्यकता आहे. निर्बंध कधी हटवले जाणार आहेत, ते लवकरच सांगू, असंही रजनीश कुमार म्हणाले आहेत. लवकरच सुधारणार येस बँकेची स्थितीयेस बँक प्रकरणात एसबीआयची भूमिका महत्त्वाची आहे. येस बँकेच्या पुनर्रचनेची एक योजना रिझर्व्ह बँकेनं काढली आहे. त्यानुसारच भारतीय स्टेट बँक येस बँकेत गुंतवणूक करणार असून, त्याची मर्यादा कमीत कमी 26 टक्के असणार आहे. तसेच ती गुंतवणूक लॉक-इन स्वरूपात राहणार आहे. एसबीआय 49 टक्क्यांपर्यंत येस बँकेत गुंतवणूक करू शकते. त्यामुळे येस बँकेची आताची जी परिस्थिती आहे, ती लवकरच सामान्य होणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी बँकिंग यंत्रणेत सुधार आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. बँकेची वित्तीय यंत्रणा सामान्यांना विश्वास देत आहे. जे पैसे बँकेत ठेवलेले आहेत, ते सुरक्षित आहेत.भारतातलं बँकिंग सिस्टीम फारच विस्तारलेलं आहे. त्यात वेगवेगळे स्तर असून, पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, को-ऑपरेटिव्ह सेक्टर आणि स्मॉल फायनान्सिंग बँकेचा समावेश आहे. खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी आरबीआयनं नियम तयार करते. त्या नियमांचं पालन करणं बँकेचा बोर्ड आणि मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. निरीक्षणाची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची असते. गेल्या काही वर्षांत अनेक बदल पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. रजनीश कुमार म्हणाले, जनतेला बँकिंग प्रणालीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर एखादी गोष्टी कमकुवत आढळल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना केली जात आहे. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. खासगी किंवा सरकार बँकेत जमा केलेल्या पैशांसंबंधी खातेदारांना घाबरून जाण्याची गरज नाही. आणखी महत्त्वाच्या बातम्या

रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात 

पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

टॅग्स :येस बँक