Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹380 वरून आपटला अन् ₹27 वर येऊन पोहोचला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; काय म्हणतायत एक्सपर्ट?

₹380 वरून आपटला अन् ₹27 वर येऊन पोहोचला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; काय म्हणतायत एक्सपर्ट?

सध्या हा शेअर 32.81 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 16% ने खाली ट्रेडिंग करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:20 PM2024-02-22T19:20:11+5:302024-02-22T19:20:28+5:30

सध्या हा शेअर 32.81 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 16% ने खाली ट्रेडिंग करत आहे.

yes bank share tumbled from ₹380 to ₹27, now a rush to buy; What do the experts say | ₹380 वरून आपटला अन् ₹27 वर येऊन पोहोचला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; काय म्हणतायत एक्सपर्ट?

₹380 वरून आपटला अन् ₹27 वर येऊन पोहोचला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; काय म्हणतायत एक्सपर्ट?

येस बँक लिमिटेडच्या शेअरने आज 7% ची उसळी घेतली आहे. ट्रेडिंग दरम्यान, कंपनीचे शेअर्स 27.33 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. सध्या हा शेअर 32.81 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 16% ने खाली ट्रेडिंग करत आहे. मात्र असले असले तरी, हा शेअर वार्षिक आधारावर 17.44 टक्क्यांनी वधारलेला आहे. येस बँक आपल्या मूव्हिंग सरासरीपेक्षा अधिक व्यवहार करत आहे. महत्वाचे म्हणजे 2018 मध्ये येस बँकेच्या शेअरची किंमत 380 रुपयांवर पोहोचली होती.

काय म्हणताय ब्रोकरेज? -
चॉइस ब्रोकिंगच्या इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट मंदार भोजने यांनी म्हटले आहे की, स्टॉक पुरेशा व्हॉल्यूमसह राउंडिंग बॉटम पॅटर्न ब्रेकआउट तयार केला आहे, जो एक मजबूत तेजीचा संकेत देतो. यस बँकेच्या शेअरची किंमत 1 जून, 2020 रोजी 32 रुपयांच्या गत स्विंग हायला यशस्वीपणे पार करत 32.85 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. 22.35 च्या पातळीवरील ब्रेकआउटपासून किंमतीत 46 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर गुरुवारी बीएसईवर इंट्राडेमध्ये 4 टक्क्यांच्या तेजीसह 26.48 रुपयांवर होता.

एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे यांनी म्हटले आहे की, मासिक चार्टवरील एकत्रीकरणादरम्यान ब्रेकआउट झाल्यानंतर येस बँकेचा स्टॉक झपाट्याने वधारला आहे. हा गुंतवणूकदारांमध्ये अचानक वृद्धीचा संकेत देतो. जसे की, 32 रुपयांच्या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या जवळपास विक्रीचा दबाव कायम ठेवण्यात हा शेअर अयशस्वी झाला, परिणामी अलीकडील घसरण झाली, असे बोलले जाते. ते म्हणाले, 33 रुपयांच्या वरचे निर्णायक पाऊल या स्टॉकला 50 रुपयांच्या पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: yes bank share tumbled from ₹380 to ₹27, now a rush to buy; What do the experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.