Join us

होम लोन पाहिजे, या ५ गोष्टींवर लक्ष द्या, तुम्हाला लवकरच मिळेल कमी व्याजदरात कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 5:25 PM

कर्ज घेण्याची गरज ही सर्वांना असते. खासकरुन गृहकर्जाची गरज प्रत्येकाला असते. प्रत्येकाचे स्वप्न असते आपले एक स्वत:चे घर असावे. यासाठी आपण स्वप्न पाहत असतो.

कर्ज घेण्याची गरज ही सर्वांना असते. खासकरुन गृहकर्जाची गरज प्रत्येकाला असते. प्रत्येकाचे स्वप्न असते आपले एक स्वत:चे घर असावे. यासाठी आपण स्वप्न पाहत असतो. पण आपल्याला माहित आहे होम लगेच मिळत नाही. बँकांच्या नियमांची यादी मोठी असते.पण जर आपण कर्ज घेण्याअगोदर नियोजन केले तर आपल्याला कर्ज लगेच मिळू शकते.

बँक तुम्हाला कर्ज देत असताना सर्व गोष्टींचा विचार करत असते. तुमच्या सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते. कर्जदार किती विश्वासार्ह आहे आणि त्याची विश्वासार्हता ही कागदपत्रांवरून दिसून येते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा, तर काही मिनिटांत लाखांचे कर्ज तुम्हाला मिळू शकते.

रेपो रेट वाढला, आता कोणती बँक Home Loan सर्वात कमी दरात देतेय?, जाणून घ्या १० बँकांचे लेटेस्ट दर

आर्थिक स्थिती 

कर्ज घेण्यापूर्वी एकदा तुमची आर्थिक परिस्थिती तपासा. त्यानुसार कर्जाची परतफेड करु शकता.तुम्ही ईएमआय भरु शकता की नाही हे अगोदर बँक पाहत अशते. त्यासाठी बँक त्या कर्जदाराचा पगार पाहत असते.

अधिक डाउन पेमेंट 

तुम्ही कर्ज घेत असताना मालमत्तेच्या मूल्याच्या २० टक्के डाउन पेमेंट देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला कमी कर्ज घ्यावे लागेल आणि तुमचा ईएमआयही कमी होईल. तुम्हाला कर्जावर कमी व्याज देखील द्यावे लागेल. त्यांुळे बँकही तुम्हाला लगेच कर्ज देईल. 

क्रेडिट स्कोअर 

कर्ज देण्यापूर्वी बँका ग्राहकांचा CIBIL स्कोर तपासत असते. क्रेडिट स्कोअर तुम्ही कर्ज घेण्यासाठी आणि परतफेड करण्यासाठी किती तयार आहात हे दाखवते. तुमचे मागील कर्ज किती प्रलंबित आहे आणि तुम्ही किती कर्जाची परतफेड करू शकता हे देखील यावरून दिसते.तुमचा आर्थिक रेकॉर्डही चांगला असेल तरच CIBIL स्कोअर चांगला असतो.

सह-अर्जदार असावा

तुम्ही कर्ज घेणार असाल तर तुमच्या आई-वडिलांना किंवा पत्नीला सहअर्जदार बनवा. त्यामुळे कर्ज लवकर मिळण्याची शक्यता वाढते. जर तुमची पत्नी देखील चांगली कमाई करत असेल, तर सहकारी अर्जदाराच्या बाबतीत बँक त्वरीत कर्ज पास करेल. 

कर्ज घेताना कागदपत्रांकडे लक्ष द्या

अनेकांना कर्ज देण्यास बँक नाकारते. ते काहीजण फॉर्म योग्यरित्या भरत नाहीत. त्यामुळे फॉर्म भरताना खूप काळजी घ्या. फॉर्ममध्ये खाते क्रमांक आणि पगाराचा तपशीलही योग्यरित्या भरावा. त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये चुका होणार नाही. 

टॅग्स :बँक