नवी दिल्ली: एक जुनी म्हण आहे, पैसा पैशाला आकर्षित करतो. हे सूत्र इतके प्रभावी आहे की, जर तुम्ही तुमच्या जीवनात योग्य प्रकारे अंमलात आणले, तर तुम्ही सुद्धा कोट्याधीश बनू शकता. यासाठी तुम्हाला फार मोठी रक्कम खर्च बचत करण्याची गरज नाही, फक्त 50 रुपये प्रतिदिन वाचवून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
कोट्याधीश होण्यासाठी फक्त दोन तत्त्वं आहेत, पहिलं म्हणजे शक्य तितक्या लवकर बचत सुरू करणं. दुसरं म्हणजे, दीर्घ कालावधीसाठी संयमानं गुंतवणूक करत राहणं. जगातील कोणत्याही श्रीमंताला पाहा, त्यांनी अगदी लहान वयातच गुंतवणूक सुरू केली होती. वॉरेन बफे हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या गुंतवणुकीच्या टिप्स जगभरात गुरू मंत्र म्हणून मानल्या जातात.
MF मध्ये SIP द्वारे बनू शकता कोट्याधीशकोट्याधीश होण्याचं पहिलं सूत्र म्हणजे, लहानपणापासूनच बचत आणि गुंतवणूक सुरू करणं. कारण जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त नफा तुम्ही कमवू शकाल. आम्ही SIP म्हणजेच म्युच्युअल फंडांमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करुन कोट्याधीश कसं व्हावं, हे सांगणार आहोत
वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक
समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे दिवसाला 50 रुपये वाचवून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. तर, वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही कोट्याधीश व्हाल. म्हणजेच, संपूर्ण 35 वर्षे तुम्ही फक्त 50 रुपये रोज वाचवून मोठी रक्कम गोळा करू शकता.
म्यूचुअल फंडमधून सरासरी 12-15 टक्के परतावा मिळतो.
(A)
- SIP अमाउंट-1500/महिना
- सरासरी रिटर्न-12.5%
- कालावधी-35 वर्षे
- एकूण गुंतवणूक-6.3 लाख रुपये
- मिळणारी एकूण रक्कम-1.1 कोटी रुपये
(B)
- SIP अमाउंट-1500/महिना
- सरासरी रिटर्न-12.5%
- कालावधी-30 वर्षे
- एकूण गुंतवणूक-5.4 लाख रुपये
- मिळणारी एकूण रक्कम-59.2 लाख रुपये
5 वर्षांचा उशीर पडेल महागवरील दोन उदाहरणावरुन तुम्हीला कळेल की, फक्त 5 वर्षांनी उशीरा गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला सुमारे 40 लाख रुपयांचं नुकसान होऊ शकतं. कारण जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर सेवानिवृत्तीचं वय म्हणजे 60 वर्षात 59.2 लाख रुपये मिळतील. तर वयाच्या 25 व्या वर्षी हीच रक्कम 1.1 कोटी रुपये असेल. त्यामुळेच होईल तितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करा.