Join us

पाेस्टातही जमा करू शकता दोन हजाराची नाेट; पण 'ही' एक अट लक्षात घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:08 IST

बँकेने हा नवा पर्याय कोणासाठी उपलब्ध करून दिला आहे, वाचा

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बाजारातील दाेन हजार रुपयांच्या चलनी नाेटा परत आणण्यासाठी पाेस्ट ऑफिसमध्ये जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पाेस्ट ऑफिसमध्ये नाेटा जमा केल्यानंतर ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

आता बँकेने नवा पर्याय अशा लाेकांसाठी उपलब्ध करून दिला आहे जे आरबीआयच्या विभागीय कार्यालयांपासून लांब राहतात. पाेस्ट ऑफिसात जमा केलेल्या नाेटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यात येतील. त्यासाठी एक अर्ज भरुन द्यावा लागेल. ही रक्कम त्यानंतर त्यांच्या खात्यात जमा हाेईल.

टॅग्स :भारतीय चलनपोस्ट ऑफिस