Join us

खूशखबर! SBI देतंय दर महिन्याला 60 हजार रुपये कमावण्याची संधी; फक्त घरबसल्या करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:43 PM

State Bank of India : आज आम्ही तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आरामात दरमहा 60 हजार रुपये कमाई करू शकता.

नवी दिल्ली - तुम्ही जर घरबसल्या एखादा बिझनेस करण्याचा विचार करत असाल किंवा जर तुम्ही एक्स्ट्रा उत्पन्नाची संधी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आरामात दरमहा 60 हजार रुपये कमाई करू शकता. SBI (State Bank of India) ही संधी तुम्हाला देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रँचायजी (SBI ATM Franchise) घेऊन तुम्ही ही कमाई करू शकता.

एटीएम मशीन बसवून देणारी कंपनी वेगळी असते. कधीही कोणत्याही बँकेतर्फे एटीएम लावून दिलं जात नाही. बँकेतर्फे काही कंपन्यांना एटीएम लावून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. ज्या प्रत्येक ठिकाणी एटीएम मशीन लावण्याचं काम करतात. कशाप्रकारे एटीएम फ्रँचायजी घेऊन चांगली कमाई करता येईल याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

SBI ATM फ्रँचायजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी 

-  तुमच्याकडे 50-80 स्‍क्वेअर फूट जागा असली पाहिजे.- दुसऱ्या एटीएमपासून त्याचं अंतर 100 मीटर असलं पाहिजे.- ही जागा तळमजला आणि चांगली प्रकाशमय असली पाहिजे.-  24 तास वीज असली पाहिजे. याशिवाय 1 किलोवॅटचं विजेचं कनेक्शन हवं.-  या एटीएममधून प्रतिदिन जवळपास 300 ट्रांजॅक्‍शन्स होण्याची क्षमता असली पाहिजे.-  ATM च्या जागेला काँक्रिटचं छत असलं पाहिजे.-  व्ही सॅट लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्‍जेशन सर्टिफिकेट हवं.

डॉक्युमेंट लिस्ट

1. आयडी प्रूफ – Aadhaar Card , Pan Card, Voter Card2. एड्रेस प्रूफ – रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल3. बँक अकाउंट आणि पासबुक4. फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर5. अन्य डॉक्युमेंट्स6. जीएसटी नंबर7. फायनॅन्शियल डॉक्युमेंट्स

कसा करता येईल एटीएम शाखेसाठी अर्ज

एसबीआय एटीएमची फ्रँचायजी काही कंपन्या देतात. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. एटीएम मशीन बसवण्यासाठी कंपन्या वेगळ्या असतात. भारतात प्रामुख्याने एटीएम बसवण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM जवळ आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन लॉगइन करून तुम्ही एटीएमसाठी अर्ज करू शकता.

ऑफिशियल वेबसाईट

Tata Indicash – www.indicash.co.inMuthoot ATM – www.muthootatm.com/suggest atm.htmlIndia One ATM – india1atm.in/rent your space

किती करावी लागते गुंतवणूक

टाटा इंडिकॅश यामधील सर्वांत मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाख रुपयांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर फ्रँचायजी देते. जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या रूपात जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकूण 5 लाखाची गुंतवणूक असते.

किती होईल कमाई 

प्रत्येक कॅश ट्रँजॅक्शनमागे 8 रूपये आणि नॉन कॅश ट्रँजॅक्शनमागे 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 33 ते 50 टक्क्यांपर्यंत आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या एटीएममार्फत रोज 250 ट्रांजॅक्शन होत असतील. ज्यापैकी 65 टक्के कॅश ट्रांजॅक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांजॅक्शन असतील तर तुमची महिन्याची कमाई जवळपास 45 हजार रुपयांच्या आसपास असेल. हेच जर रोज 500 ट्रांजॅक्शन झाल्यास जवळपास 88-90 हजार रूपयाचं कमीशन मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :एसबीआयपैसा