Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office: पोस्टाची भन्नाट योजना! केवळ १५० रुपये गुंतवा आणि कमवा तब्बल २० लाख; कसे? पाहा, डिटेल्स

Post Office: पोस्टाची भन्नाट योजना! केवळ १५० रुपये गुंतवा आणि कमवा तब्बल २० लाख; कसे? पाहा, डिटेल्स

Post Office: सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस योजनांकडे पाहिले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:59 PM2022-02-04T21:59:42+5:302022-02-04T21:59:59+5:30

Post Office: सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस योजनांकडे पाहिले जाते.

you can earn more than rs 20 lakh on an investment of just rs 150 daily know ppf post office yojana | Post Office: पोस्टाची भन्नाट योजना! केवळ १५० रुपये गुंतवा आणि कमवा तब्बल २० लाख; कसे? पाहा, डिटेल्स

Post Office: पोस्टाची भन्नाट योजना! केवळ १५० रुपये गुंतवा आणि कमवा तब्बल २० लाख; कसे? पाहा, डिटेल्स

नवी दिल्ली: देशभरात भारतीय पोस्ट ऑफिसचे (Post Office) जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. पोस्टाच्या एकापेक्षा एक उत्तम योजना असून, यातून ग्राहकांना तसेच गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळू शकतो. मात्र, गुंवतणूक करताना योग्य माहिती घेतल्यास जबरदस्त रिटर्न्स मिळू शकतात, असे सांगितले जाते. पोस्ट ऑफिसची एक कमाल योजना असून, यामध्ये दररोज केवळ १५० रुपये गुंतवले, तर २० लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते. सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस योजनांकडे पाहिले जाते. 

पोस्ट ऑफिसची ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ स्कीम आहे. तुम्ही तुमच्या दररोजच्या खर्चातून काही अनावश्यक खर्च थांबवल्यास १००-१५० रुपये रोज बचत करू शकता. इतकेच नाहीतर हे पैसे तुम्ही सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये टाकले तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते. 

मोठा परतावा मिळवण्याची सर्वोत्तम संधी

जर तुमचे वय २५ वर्षे असेल तर लहान रकमेमध्ये मोठा परतावा मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. जर तुमचे उत्पन्न ३०-३५ हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीव्यतिरिक्त, सुरुवातीला तुम्ही दररोज १००-१५० रुपये वाचवू शकता. ही बचत तुम्हाला ४५ व्या वर्षी २० लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा देऊ शकते. जर तुम्ही दररोज १५० रुपयांची बचत पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर ते मासिक ४५०० रुपये होईल. दरमहा ४५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक ५४ हजार रुपयांची गुंतवणूक होईल. २० वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक १०.८० लाख रुपये असेल. ७.१ टक्के वार्षिक चक्रवाढीमध्ये तुम्हाला २० वर्षांत २० लाखांपेक्षा जास्त निधी तयार होईल, असे सांगितले जाते. 

पीपीएफ खाते उघडा, भरघोस लाभ मिळवा

हे खाते फक्त १०० रुपयांमध्ये उघडता येते. याचं जॉईंट खातेही उघडता येते. खाते उघडतानाच नॉमिनेशनची सुविधा आहे. १५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही २ वेळा ५-५ वर्षांसाठी वाढवता येतो. यातून मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. तिसर्‍या आर्थिक वर्षापासून खात्यावर कर्जही घेता येते. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. PPF वर ७.१ टक्के व्याजदर आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. या खात्यात वर्षभरात किमान ५०० रुपये गुंतवणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.
 

Web Title: you can earn more than rs 20 lakh on an investment of just rs 150 daily know ppf post office yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.