सध्या बरेच जण इन्शुरन्स घेत असततात. परंतु अनेकदा आपल्याला येणारा मोठा प्रिमियम पाहून लोकं त्याकडे येणं टाळतात. परंतु यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojna) ही स्कीम सुरू केली आहे. हा प्लॅन कमी पैशात टर्म इन्शुरन्स करण्याचा एक उत्तम पर्यायही आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक मुदत योजना आहे, ज्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा गुंतवणूकीनंतर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. याची विशेष बाब म्हणजे हा प्लॅन खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही. याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचं वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असणं अनिवार्य आहे. या पॉलिसीची मॅच्युरिटी ५५ वर्षांची असून दरवर्षी टर्म अश्योर्ड करावी लागते. याशिवाय विम्याची एकूण रक्कम ही २ लाख रूपये इतकी आहे. या टर्म प्लॅनचा वर्षाचा प्रिमिअम ३३० रूपये इतका आहे. ही रक्कम ECS द्वारे घेतली जाते. तसंच कोणत्या बँकेच्या ब्रान्चमध्ये जाऊन किंवा नेट बँकींगच्या माध्यमातून ही पॉलिसी घेता येते. स्कीमच्या पोर्टलवर जाऊनही तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मे महिन्याच्या अखेरीस या पॉलिसीची रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली जाईल.
३१ मे पर्यंतच कव्हरेज यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे ही पॉलिसी तुम्ही केव्हाही घेतली तरी पहिलं कव्हरेज त्या वर्षाच्या ३१ मे या तारखेपर्यंतच असेल. दरवर्षी जून महिन्यात १ तारखेला प्रिमिअमची रक्कम देऊन ती पॉलिसी रिन्यू केली जाऊ शकते. टर्म प्लॅननुसार जेव्हा विमा धारकाचा मृत्यू होतो त्यावेळी त्या विम्याची संपूर्ण रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना मिळतो.