Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता कुठल्याही बँकेच्या एटीएममधून हव्या त्या बँकेत जमा करता येणार रोख रक्कम

आता कुठल्याही बँकेच्या एटीएममधून हव्या त्या बँकेत जमा करता येणार रोख रक्कम

ही सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा करून अन्य बँकेच्या खात्यात रक्कम पाठवता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:45 PM2020-01-13T12:45:42+5:302020-01-13T12:48:24+5:30

ही सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा करून अन्य बँकेच्या खात्यात रक्कम पाठवता येईल.

You can now deposit cash at any bank's ATM where you want it | आता कुठल्याही बँकेच्या एटीएममधून हव्या त्या बँकेत जमा करता येणार रोख रक्कम

आता कुठल्याही बँकेच्या एटीएममधून हव्या त्या बँकेत जमा करता येणार रोख रक्कम

मुंबई - एटीएममधूनबँकेत रोख रक्कम जमा करणे आता अधिक सोपे होणार आहे. यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थातUPI च्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पेमेंट करण्याच्या सुविधेमुळे बँक व्यवहार करणे बऱ्यापैकी सोपे झाले आहे. त्यामुळे आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने आता रोख रक्कम जमा करण्यासाठीही अशाच प्रकारची सुविधा अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी  NPCI कडून बँकांकडे अशी सुविधा अमलात आणण्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. ही सुविधा बँकांनी त्यांच्या शाखेत किंवा अन्य ठिकाणी असलेल्या एटीएम सुरू करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.  

नॅशनल फायनँशियल स्वीचच्या माध्यमातून इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट सिस्टिम सुरू केल्यामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमधील रोख चलन सांभाळण्याची गजर कमी होईल. हा स्विच इंस्टिट्युट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी ((IDRBT) ने विकसित केला आहे. असे केल्याने एटीएम ऑपरेटर्सनासुद्धा मशीनमध्ये रोख रक्कम भरण्याची गरज कमी करता येईल. तसेच एटीएममध्ये भरण्यात आलेली रक्कम एटीएममधून रोख काढण्यासाठी उपलब्ध करून देता येईल, असे एनपीसीआयचे म्हणणे आहे. 


 सर्व सरकारी आणि खासगी बँकांना इंटरऑपरेबल नेटवर्कशी जोडून घेण्यास सांगण्यात आले आहे. मात्र बँकानी याबाबत निर्णय घेण्यापूर्वी काही पैलूंबाबत विचार करणे गरजेचे आहे. तसेच ही व्यवस्था वापरात आणण्यापूर्वी चलनातील खोट्या नोटांद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे. 

 इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिट नेटवर्कवर 14 बँका यापूर्वीच आलेल्या आहेत. तसेच आयडीआरबीटीची प्रणाली अंमलात आणण्यासाठी बँकांना आपल्या 30 हजार एटीएममध्ये फारमोठे बदल करावे लागणार नाहीत. तसेस त्यासाठी वेगळ्या हार्डवेअरचीही गरज पडणार नाही.   

दरम्यान, ही सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून अन्य बँकेच्या खात्यात रक्कम पाठवता येणार आहे. सध्या एका बँकेच्या एटीएममधून त्या बँकेच्या खात्यात रोख रक्कम पाठवता येते. आता ही सुविधा सुरू झाल्यानंतर ई-कॉमर्स कंपन्या, फूड अॅग्रिगेटर्स यांना लाभ होणार आहे. तसेच डिलिव्हरी एजंट्सनाही रोख रक्कम स्वत:कडे सांभाळावी लागणार नाही.  

Web Title: You can now deposit cash at any bank's ATM where you want it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.