Join us

‘पीएफ’मध्ये आता करू शकाल ही माहिती अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:47 AM

ही माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात माेठे नुकसान हाेऊ शकते. 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एक महत्त्वाची नाेटीस जारी केली आहे. त्याद्वारे सदस्यांच्या खात्यांमधील नाव, आधारसह ११ प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी नवीन प्रक्रिया जारी केली आहे. ही माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात माेठे नुकसान हाेऊ शकते. संस्थेनं जारी केलेल्या नवीन परिपत्रकात नाव, लिंग, जन्मतारीख, वडिलांचे नाव, नातेसंबंध, वैवाहिक स्थिती, सामील होण्याची तारीख, सोडण्याचे कारण, सोडण्याची तारीख, राष्ट्रीयत्व आणि आधार क्रमांक अपडेट करण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. 

याबाबत काळजी घ्याप्रकियांमध्ये अनियमित आणि नॉन स्टँडर्डायझेशनच्या कारणामुळे काही प्रकरणांत सदस्याच्या ओळखीशी छेडछाड केल्याचे आढळले आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचेही दिसून आले. ११ पैकी ५ बदल सामान्य असल्याचे गृहित धरण्यात आलेत. यापेक्षा अधिक बदलांवर सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी