नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पीएफही (PF) कापला गेला पाहिजे. सेवानिवृत्तीसाठी पीएफची रक्कम (PF Amount) खूप महत्त्वाची मानली जाते, ही रक्कम तुम्हाला निवृत्तीच्या वेळी खूप मदत करू शकते. त्यामुळे पीएफ काढू नये असा सल्ला दिला जातो. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) बँक डिटेल्सची मोठी भूमिका असते.
तुमचे बँक डिटेल्स अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि बँक खाते अपडेट केले नसेल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या बँकेचे डिटेल्स अपडेट करू शकता. जर तुमचा जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक EPFO मध्ये दिला असेल, तर तुम्ही तुमचे नवीन बँक खाते UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे सहजपणे अपडेट करू शकता.
'ही' आहे प्रक्रिया...- ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे डिटेल टाकून लॉग इन करा.- टॉप मेनूवरील 'Manage' टॅबवर क्लिक करा.- ड्रॉप डाउन मेनूमधून 'KYC' पर्यायावर जा आणि डॉक्यूमेंट टाइपमध्ये 'Bank' निवडा.- बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडसह नवीन बँक तपशील प्रविष्ट करा.- अपडेट बँक डिटेल्स अपलोड करण्यासाठी 'Save' वर क्लिक करा. नंतर तुमची विनंती KYC Pending for Approval म्हणून दिसून येईल.- आता आवश्यक कागदपत्रे तुमच्या कंपनीकडे जमा करा.- कंपनीकडून मंजूरी मिळाल्यानंतर, तुम्हाला केवायसी मंजुरीसाठी प्रलंबित असलेले डिजिटली मंजूर केवायसीमध्ये बदललेले दिसेल.
अशाप्रकारे चेक करा पीएफ बॅलन्स...- EPFO सदस्यांनी www.epfindia.gov.in या वेबसाइटवर जावे.- आता 'Our Services' टॅबमधून 'For Employees' ऑप्शनवर क्लिक करा.>> त्यानंतर 'Services' टॅबमधून 'Member Passbook' वर क्लिक करा.>> यानंतर तुम्ही लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाका. नंतर तुम्हाला तुमच्या PF खात्याचे पासबुक पाहता येईल.
ऑनलाइन प्रणालीची सुविधासध्या संपूर्ण व्यवस्था डिजिटल आणि ऑनलाइन होत आहे. त्यामुळे EPFO सुद्धा आपल्या सदस्यांसाठी ऑनलाइनच्या सुविधा देत आहेत. EPFO ने आपल्या सर्व सदस्यांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची सुविधा दिली आहे. ज्या सदस्यांकडे UAN क्रमांक आहे, ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकतात.
UAN चे मोठे फायदेUAN चे अनेक फायदे आहेत. EPFO सदस्य या युनिक नंबरद्वारे पेन्शन फंडाचे डिटेल्स एकाच ठिकाणी पाहू शकतात, पीएफ खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती मिळवू शकतात, EPFO मध्ये दिलेले बँक डिटेल्स देखील अपडेट करू शकतात. याचा अर्थ असा की EPFO सदस्य सहजपणे बँकेचे डिटेल्स बदलू शकतात आणि हे काम घरी बसून ऑनलाइन होऊ शकते.