Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar मध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम

Aadhaar मध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम

पाहा काय होणार यात मोठा बदल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:10 PM2022-09-21T14:10:59+5:302022-09-21T14:11:05+5:30

पाहा काय होणार यात मोठा बदल.

you can update your aadhaar data like biometrics detail every 10 years bal aadhaar big change demographic changes | Aadhaar मध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम

Aadhaar मध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम

आधारची व्याप्ती वाढवण्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. यासाठी आधारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयनं राज्यांना सरकारी कामात आधारची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे, जेणेकरून सरकारी पैशांचा अपव्यय थांबवता येईल. या योजनेनुसार, राज्यांमधील सरकारी योजनांमध्ये आधार ऑथेंटिकेशनचा वापर वाढवण्यात येणार आहे. बनावट लाभार्थ्यांना योजनेच्या कक्षेतून वगळणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

या कामात तेजी आणण्यासाठी युआयडीएआय राज्यांच्या कर्मचाऱ्यांना आधारशी निगडीत प्रशिक्षण देत आहे. या योजनेनुसार युआयडीएआय लोकांना १० वर्षांमध्ये एकदा आपले बायोमॅट्रिक अपडेट करणं, डेमोग्राफिक माहिती अपडेट करण्याची मुभा देणार आहे. सध्या हा नियम नाही. सध्याच्या नियमानुसार ५ ते १५ वर्षांच्या मुलांनाच बायोमॅट्रिक अपडेट करण्याची परवानगी आहे.

बायोमॅट्रिक अपडेट
५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बाल आधार तयार केले जाते. यामध्ये त्यांचा फोटो असतो, तसंच आई-वडिल किंवा पालकांचे बायमेट्रिक डिटेल्स असतात. जेव्हा मुल १५ वर्षांचं होतं तेव्हा त्या मुलाचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट केले जातात. अशातच नाव आणि पत्ताही अपडेट केला जातो.

आधारचा गैरवापर टाळण्यासाठी युआयडीएआय त्याला लॉक करण्याचा सल्ला देतं. या खास फीचरच्या माध्यमातून आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक केला जाऊ शकतो. यामुळे कार्डधारकाचे बायोमेट्रिक सुरक्षित राहतात आणि गोपनीयता कायम राहते. त्या व्यक्तीला हवं असल्यास ऑथेंटिकेशनच्या पहिलेदेखईल आधार लॉक किंवा अनलॉक करू शकते.

Web Title: you can update your aadhaar data like biometrics detail every 10 years bal aadhaar big change demographic changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.