Join us

मुलीच्या लग्नासाठी काढू शकता PF मधून ॲडव्हान्स्ड रक्कम, हा आहे सरकारी नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:15 AM

आपत्कालीन परिस्थितीत किंवा मोठ्या खर्चासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून (EPF) मधून ॲडव्हान्स्ड रक्कम काढता येते.

EPF Advance For Marriage: जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी पैसे हवे असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी ॲडव्हान्स्ड रक्कम कशी काढू शकता याबद्दल माहिती देणार आहोत. आपत्कालीन परिस्थितीत किंवा मोठ्या खर्चासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून (EPF) मधून ॲडव्हान्स्ड रक्कम काढता येते. सरकारच्या नियमानुसार कोणत्या परिस्थितीत तुम्ही ही रक्कम काढू शकता हे पाहणार आहोत. 

कोणत्या कारणासाठी पैसे काढता येतात? 

वैद्यकीय आणीबाणीशिक्षणलग्नजमीन खरेदीसाठीघराच्या नुतनीकरणासाठीबेरोजगार असल्यासमुलांचे लग्नसदस्यात्वाची ७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ईपीएफमधून ॲडव्हान्स्ड रक्कम काढता येते. 

ॲडव्हान्स्ड क्लेम केव्हा करता येतो? 

विवाहासाठी ईपीएफ ॲडव्हान्स्डईपीएफ सदस्याचा विवाहमुलाचं किंवा मुलीचं लग्नभाऊ/बहिणीचं लग्नतुम्ही ईपीएफमधून ५० टक्क्यांपर्यंत ॲडव्हान्स्ड रक्कम काढू शकता. 

घर खरेदी किंवा होम लोनसाठी काय नियम? 

तुमचं घर खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या पीएफमधून पैसे काढू शकता. ईपीएफ योजनेच्या कलम 68BB नुसार, तुम्ही तुमच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी ईपीएफमधून पैसे देखील घेऊ शकता. त्यासाठी घराची नोंदणी तुमच्या पर्सनल किंवा जॉईंट नावानं करावी लागते. गृहकर्ज अर्जदाराकडे किमान दहा वर्षांच्या पीएफ योगदानाची नोंद असणे आवश्यक आहे. पाच वर्षे सतत सेवा पूर्ण केल्यानंतर काढलेल्या पीएफच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. 

अशी काढू शकता ॲडव्हान्स्ड रक्कम 

  • पीएफमधून ॲडव्हान्स्ड पैसे काढण्यासाठी www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होम पेजवरील ऑनलाइन ॲडव्हान्स क्लेमवर क्लिक करा. तुम्हाला https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर लॉग इन करावं लागेल.
  • तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून UAN मेंबर्स पोर्टलवर साइन इन करावं लागेल.
  • 'ऑनलाइन सर्व्हिसेस' टॅबवर क्लिक करा आणि EPF मधून पीएपी अॅडव्हान्स्ड रक्कम काढण्यासाठी फॉर्म निवडा. ड्रॉप-डाउन मेनूमधून 'क्लेम फॉर्म (फॉर्म-31, 19,10C आणि 10D)' निवडा.
  • दिलेल्या विंडोमध्ये तुमच्या बँक खात्याचे शेवटचे ४ अंक एन्टर करा आणि व्हेरिफाय करा.
  • व्हेरिफिकेशननंतर, Proceed for Online Claim वर क्लिक करा
  • ड्रॉप डाउनमधून पीएफ ॲडव्हान्स निवडा (फॉर्म 31)
  • तुम्हाला कोणत्या कारणासाठी पीएफ काढायचा आहे ते कारण निवडा आणि तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत ते एंटर करा. चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता लिहा.
  • Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP एन्टर करा.
  • यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल. तसंच काही दिवसांत पीएफ क्लेमचे पैसे तुमच्या खात्यात येतील.

ईपीएफमधून पैसे काढताना ते विचारपूर्वक काढणं आवश्यक आहे. कारण एकदा त्यातून पैसे काढले की पुन्हा त्यात ते टाकता येत नाहीत. ईपीएफ ॲडव्हान्स्ड रक्कम काढण्यासाठी सदस्याने नियोक्ता किंवा कंपनीकडे फॉर्म ३१ सबमिट करणं आवश्यक आहे. यानंतर नियोक्ता अर्जाची पडताळणी करेल आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी ईपीएफओकडे पाठवेल. एकदा मंजूर झाल्यानंतर, रक्कम सदस्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीलग्न