Travel Tips: अनेकजण परदेशात फिरायला जाण्याचा विचार करतात. पण, कधी बजेटमुळे तर कधी योग्यवेळी विमानाची तिकीटे न मिळाल्यामुळे प्लॅन कॅन्सल करावा लागतो. तुमच्यासोबतही असे घडले असेल. आता चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या कारने जाऊ शकता. याचा फायदा असा होईल की, तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रवासाचे नियोजन करू शकता आणि हा प्रवास तुमच्या बजेटमध्ये असेल.
नेपाळयात पहिले नाव नेपाळचे आहे, कारण या देशाची सीमा भारताला लागून आहे. तुम्ही नेपाळला कधी जाऊ शकता. नेपाळसाठी तुम्ही नवी दिल्लीहून लखनौ, बाराबंकी, फैजाबाद, बस्ती, चंद्रगिरी मार्गे नेपाळची राजधानी काठमांडू गाठू शकता. नेपाळमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत मजा करू शकता.
भूतानशांत वातावरण आवडणाऱ्या लोकांसाठी भूतान चांगला देश आहे. दिल्ली ते भूतान, हे अंतर सुमारे 2006 किलोमीटर आहे. तुम्ही कारने जात असाल तर तुम्ही दिल्लीहून भूतानला उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम मार्गे जाऊ शकता. या देशातही अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत.
बांग्लादेशबांगलादेश हादेखील भारताच्या अगदी जवळ असलेला देश आहे. या देशातही तुम्ही कारने प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला दिल्लीहून उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमार्गे बांग्लादेशची राजधानी ढाका गाठावे लागेल. या प्रवासाला सुमारे 30 तास लागतील.
थायलंडथायलंडला हवाई प्रवास करणे अधिक सोयीचे आहे. पण, तुम्हाला अॅडव्हेंचरची आवड असेल, तर तुम्ही कारनेही प्रवास करू शकता. दिल्लीहून इम्फाळ, मोरे, बागान, इनले लेक, यंगून, मायसोट, टाक आणि बँकॉक मार्गे थायलंडला जाता येते. यासाठी सुमारे 71 तासांचा प्रवास करावा लागेल.
या गोष्टी लक्षात ठेवाया देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, प्रवासाची कागदपत्रे, व्हिसा, रस्त्यासाठी आवश्यक परवाने, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे. जर तुम्ही ही व्यवस्था केली तर तुम्ही या देशांत कारनेही जाऊ शकता.