Lokmat Money > बिझनेस न्यूज > आपणही व्हाल अफाट संपत्तीचे मालक! शेअर बाजार म्हणजे सट्टा की अभ्यासपूर्ण गुंतवणूक?

आपणही व्हाल अफाट संपत्तीचे मालक! शेअर बाजार म्हणजे सट्टा की अभ्यासपूर्ण गुंतवणूक?

शेअर बाजारात धैर्य आणि चिकाटी याद्वारे आपणही अफाट संपत्तीचे मालक नक्कीच होऊ शकता. कसे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:21 AM2022-05-23T09:21:27+5:302022-05-23T09:21:49+5:30

शेअर बाजारात धैर्य आणि चिकाटी याद्वारे आपणही अफाट संपत्तीचे मालक नक्कीच होऊ शकता. कसे? जाणून घ्या...

you too will be the owner of immense wealth from share market stock trading | आपणही व्हाल अफाट संपत्तीचे मालक! शेअर बाजार म्हणजे सट्टा की अभ्यासपूर्ण गुंतवणूक?

आपणही व्हाल अफाट संपत्तीचे मालक! शेअर बाजार म्हणजे सट्टा की अभ्यासपूर्ण गुंतवणूक?

- पुष्कर कुलकर्णी 

लोकमत न्यूज नेटवर्क । शेअर बाजार म्हणजे सट्टा की अभ्यासपूर्ण गुंतवणूक? याचे उत्तर प्रत्येकाच्या मनात असते. जो शेअर बाजाराकडे जसे पाहतो तसे त्यास दिसते. कोणताही अभ्यास न करता बाजारात खेळणे म्हणजे सट्टा. यात गुंतवणूकदार अंदाजे ट्रेड करतो आणि बहुतांश वेळेस भावनिक निर्णय घेत असतो. खरे तर शेअर बाजार म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास यात आपली संपत्ती अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असते.

नेमकी कशी बनते संपत्ती?

फंडामेंटल उत्कृष्ट कंपन्यांची निवड करा. कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक दीर्घकालीन ठेवा. शक्यतो १०/१५ वर्षे आणि अधिक. शेअर चा भाव रोज पाहू नका. फक्त कंपनी फंडामेंटल्स ठीक ठाक आहेत ना याची  खातरजमा करीत रहा. कंपनीची उलाढाल, नफा आणि नफा मार्जिन जसे वाढत जाते तसे शेअरला मागणी वाढते. परिणामी भाव वाढत जातो. याच बरोबर बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट माध्यमातून आपल्या खात्यातील शेअर्स संख्याही वाढत जाते. कमी वयात गुंतवणूक सुरू करा. जितकी रक्कम दरमहा दीर्घ कालीन गुंतवणुकीस शक्य आहे तितकीच गुंतवीत राहा. शेअर बाजारात धैर्य आणि चिकाटी याद्वारे आपणही अफाट संपत्तीचे मालक नक्कीच होऊ शकता.

उदाहरणादाखल खालील कंपन्यांचे शेअरचे भाव कसे वाढत गेले हे पाहा...

कंपनीचे नाव    सेक्टर    मे-०७    मे-१२    मे-१७    मे-२०२२    

बजाज फायनान्स    एनबीएफसी    ३७/-    ८२/-    १३२५/-    ५५००/- 
अतुल लिमिटेड    केमिकल    ८८/-    १९८/-    २५४०/-    ८३००/-
रिलायन्स इंडस्ट्रीज    एनर्जी    ४३५/-    ३५०/-    ६३३/-    २४८०/-
नेस्ले इंडिया    एफएमसीजी    ३,९९३/-    ४५६०/-    ६६५०/-    १६३००/-
विप्रो    आय टी    १२०/-    १५८/-    १९८/-    ४५३/-
एशियन पेंट्स    पेंट्स    ८०/-    ३६१/-    ११३२/-    ३०४०/-
बाटा इंडिया    फुटवेअर    ८६/-    ४२२/-    ५३६/-    १७३०/-
(आकडे रुपयामध्ये)
 

Web Title: you too will be the owner of immense wealth from share market stock trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.