नवी दिल्ली - उद्या म्हणजेच १ डिसेंबर २०२२ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) किरकोळ ग्राहकांसाठी आपला डिजिटल रुपया लॉन्च करणार आहे. डिजिटल रुपया आल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खिशात रोख पैसे ठेवण्याची गरज नाही. हे रुपये सध्याच्या नोटांप्रमाणे वापरली जाऊ शकतात परंतु डिजिटल पद्धतीने. E-Rupee डिजिटल टोकनप्रमाणे काम करेल. आता त्याचा वापर कसा होणार हा प्रश्न आहे. चला सोप्या पद्धतीने समजून घेऊया...
होलसेल-रिटेल वापरात काय फरक?
होलसेलनंतर आता रिटेलमध्ये वापरण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा डिजिटल रुपया उद्यापासून देशातील काही निवडक ठिकाणी आणला जाईल. यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी होलसेल वापरासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे खरं तर ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. जेथे वित्तीय संस्था होलसेल डिजिटल चलन वापरतात, तर रिटेल करेंसीचा वापर सामान्य लोक करू शकतात.
वस्तू खरेदी करणे, ट्रान्सफर करणे शक्य
E-Rupee, भारतीय चलनाचे डिजिटल रूप बँकांद्वारे वितरित केले जाईल. युजर्स बँकांद्वारे दिलेल्या आणि मोबाईल फोन आणि डिवाईसमध्ये स्टोर्ड डिजिटल वॉलेटद्वारे ई-रुपी व्यवहार करू शकतात. तुम्ही मोबाईलवरून ते एकमेकांना सहज पाठवू शकाल आणि सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकाल. आरबीआय या डिजिटल रुपयाचे पूर्णपणे नियमन करेल. म्हणजे, जसे तुम्ही दुकानात जाऊन डाळ, तांदूळ किंवा दुधाशिवाय घरगुती रेशन खरेदी करता तेव्हा तुम्ही रोख देता... उद्यापासून तुम्ही ई-रुपी वापरून दुकानातून हे सर्व खरेदी करू शकाल.
या शहरांपासून होणार सुरुवात
रिपोर्टनुसार, RBI उद्यापासून मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यात SBI, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश असेल. यानंतर हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल. P2P आणि P2M मधील व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते म्हणजे व्यक्ती-ते-व्यक्ती किंवा व्यक्ती-व्यापारी. जर तुम्ही एखाद्याला ई-रुपी ट्रान्सफर करत असाल, तर तो P2P श्रेणीत येईल आणि जर तुम्ही दुकानातून डाळी, मैदा, तांदूळ किंवा इतर काही खरेदी करत असाल, तर पैसे पेमेंट टू मर्चंट श्रेणीत असेल.
मोबाईल वॉलेटप्रमाणे बॅलेन्स पाहू शकता
CBDC तुमच्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिसेल. ते ऑनलाईन तपासण्याची पद्धत अगदी तशीच आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक किंवा मोबाईल वॉलेट शिल्लक तपासतो. या डिजिटल चलनाला UPI शी जोडण्याची तयारीही सुरू आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल वॉलेटमध्ये RBI चे हे डिजिटल चलन ई-रुपी देखील ठेवू शकाल. यासोबतच ते बँकेच्या पैशात किंवा रोखीतही कन्वर्ट केले जाऊ शकते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"