Join us  

कमी गुंतवणुकीत 'लखपती' व्हाल; 'या' सरकारी योजनेत सहभागी व्हा, जाणून घ्या प्रक्रिया?  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 6:42 AM

कोणताही भारतीय नागरिक सरकारी बँका, पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेसाठीचे खाते उघडू शकतो

करबचत करताना जोखीम न घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र त्याचबरोबर या गुंतवणुकीवरील परताव्याची हमी व चांगला व्याजदर जर मिळाला तर सोने पे सुहागा. हे सर्व देणारी एक योजना म्हणजेच गुंतवणुकीची कामधेनू म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ). याबाबत जाणून घेऊया...

योजनेची वैशिष्ट्येव्याजदर ७.१ टक्के (हा दर तीन महिन्यांनी बदलू शकतो. केंद्र सरकारकडून तो जाहीर केला जातो)योजनेची मुदत : १५ वर्षकिमान गुंतवणूक : ५०० रुपये वर्षातून किमान एकदाकमाल गुंतवणूक : १,५०,००० प्रति वर्षकर सवलत : आयकर कायद्याच्या कलम ८० सी खाली वर्षाला १.५० लाख रुपयांपर्यंतसुरक्षितता :  या योजनेमध्ये गुंतविलेली संपूर्ण रक्कम ही सुरक्षित असून त्यावर मिळणारे व्याज जाहीर दराप्रमाणे नियिमतपणे जमा केले जाते.

कर लाभआयकर कायद्याच्या कलम ८० सी प्रमाणे सूट मिळते.आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त १लाख ५० हजार रु. पात्र ठरतात.गुंतविलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज करमुक्त असते.योजनेची मुदत संपल्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही.

कोण सहभागी होऊ शकतो?कोणताही भारतीय नागरिक सरकारी बँका, पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेसाठीचे खाते उघडू शकतो. याशिवाय काही खासगी क्षेत्रातील बँकांनाही ही खाती सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकाला एकच खाते उघडता येते. अज्ञान बालकांच्या नावे पालक खाते उघडू शकतात.

कर्जाची सुविधाया खात्यामधून मुदतपूर्व रक्कम काढता येत नसली तरी खातेदारांना कर्जाची सुविधा उपलब्ध असते. खाते उघडल्यापासून तिसऱ्या आणि सहाव्या वर्षामध्ये कर्ज घेता येते. त्याच्या परतफेडीची मुदत जास्तीत जास्त ३६ महिन्यांची असते.

लॉक इन पिरीएडया योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर पाच वर्षांचा लॉक इन पिरीएड असतो. त्याकाळामध्ये पैसे काढता येत नाहीत. मात्र ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढून घेता येते. या रक्कम काढण्यामुळे मिळणाऱ्या व्याजापेक्षा १ टक्का व्याज कमी होत होते. संपूर्ण रक्कम मुदतीआधी काढता येते? जीवनसाथीचे अथवा मुलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण यासाठी पूर्ण रक्कम काढता येते. मुदत पूर्ण होण्याआधीच खातेदाराचा  दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पाच वर्षांची अट पूर्ण न करताही रक्कम काढून घेता येते.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूक