Join us  

पोस्ट ऑफिस 'या' स्कीममध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 3:38 PM

post office : या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कोणाशीही संपर्क साधण्याची गरज भासणार नाही.

नवी दिल्ली : तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागतील, त्यानंतर तुम्हाला दरमहा 2500 रुपये पेन्शन (Pension) मिळत राहील. तसेच, या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कोणाशीही संपर्क साधण्याची गरज भासणार नाही.

रिटायरमेंटनंतर जर तुम्ही तुमच्या जमा झालेल्या भांडवलाचा काही भाग म्हणजेच 4.50 लाख रुपये पोस्ट ऑफिसच्या (Post Office) स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम (Small Savings Scheme) मंथली इन्कम स्कीम (POMIS) मध्ये 4.50 लाख रुपये जमा केले तर  4.50 लाखांऐवजी दरमहा जवळपास 2500 रुपयांचे निश्चित इन्कम सुरू होईल. जर तुमच्याकडेही एकरकमी रक्कम असेल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीमद्वारे मंथली इन्कम मिळवू शकता. तुम्हाला ज्वॉइंट अकाउंटद्वारे दुहेरी लाभ देखील मिळू शकतो.

पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम गुंतवणूकदारांना दरमहा इन्कमची संधी देते. ही एक खास स्कीम आहे, जिथे तुम्ही एकरकमी पैसे गुंतवून दरमहा कमवू शकता. या स्कीममध्ये तुमचे जमा केलेले पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्ही 5 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता. मंथली इन्कम स्कीमअंतर्गत सिंगल आणि ज्वॉइंट अकाउंट उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अनेकजण या स्कीमचा लाभ घेत आहेत. पोस्ट ऑफिसची स्कीम असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

आधीपेक्षा जास्त मिळेल व्याजकेंद्र सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी काही स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर वाढवले ​​आहेत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस  मंथली इन्कम स्कीम देखील समाविष्ट आहे. सरकारने या मंथली इन्कम स्कीमवरील व्याजदर 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्के केला आहे. त्यामुळे या स्कीममध्ये पैसे जमा करणाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार आहे.

दर महिन्याला 5025 रुपये मिळतील मंथली इन्कम स्कीममध्ये एका अकाउंटद्वारे जास्तीत जास्त 4.50 लाख रुपये आणि ज्वॉइंट अकाउंटद्वारे 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. स्कीममधली व्याज आता 6.7 टक्के वार्षिक झाले आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केले असतील, तर वार्षिक 6.7 टक्के व्याजदरानुसार एका वर्षाचे एकूण 60300 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 5025 रुपये असेल. याचबरोबर, जर तुम्ही सिंगल अकाउंटद्वारे 4,50,000 लाख रुपये जमा केले तर मासिक व्याज 2513 रुपये असेल. 3 एडल्ट देखील ज्वॉइंट अकाउंटमध्ये सामील होऊ शकतात. परंतु गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे.

मंथली इन्कम स्कीमचे फायदे!- या स्कीमचा कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु 5 वर्षानंतर नवीन व्याजदरानुसार वाढवता येईल.- स्कीमअंतर्गत, तुम्हाला बँक एफडीच्या तुलनेत चांगला परतावा मिळत आहे.- जर तुम्ही मासिक पैसे काढले नाहीत, तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये राहतील आणि तुम्हाला हे पैसे मूळ रकमेसह जोडून आणखी व्याज मिळेल.

टॅग्स :पोस्ट ऑफिसपैसा