Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

चांगल्या परताव्यामुळे बाजाराचे आकर्षण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:18 AM2024-10-02T06:18:58+5:302024-10-02T06:19:06+5:30

चांगल्या परताव्यामुळे बाजाराचे आकर्षण वाढले

Young people become investors; 40% only in thirties | गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : चांगल्या परताव्यामुळे आता बाजारात तिशीतील तरुण गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढले आहे. सहा वर्षांत तिशीतील तरुणांचे प्रमाण ४० टक्के इतके वाढल्याचे शेअर बाजारातून मिळालेल्या आकेडवारीतून दिसून येते. 

२०१८ मध्ये तिशीतील तरुण गुंतवणूकदारांचा वाटा २२.९ टक्के इतका होता. ऑगस्ट २०२४ पर्यंत तरुण गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढून ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले. ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील गुंतवणूकदारांचा वाटा १२.७ टक्क्यांवरून घटून ७.२ टक्के इतका झाला आहे. इतर वयोगटातील गुंतवणूकदार संख्या स्थिर आहे.  काहींमध्ये घट झाली आहे. ३० ते ३९ हा वयोगट व ४० ते ४९ वयोगटातील गुंतवणूकदारांची संख्या जवळपास स्थिर असल्याचे दिसत आहे. 

आकर्षण का वाढले?
nचांगला परतावा मिळत असल्याने तरुणांना एफडी किंवा इतर पर्यायांपेक्षा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, आयपीओ हे पर्याय अधिक सोयीचे वाटतात. 
nमहिन्याकाठी लहान लहान रकमेची गुंतवणूक तरुणांना एसआयपीद्वारे शक्य आहे. दीर्घ मुदतीसाठी हा पर्याय फायद्याचा आणि विश्वासार्ह असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. 
nगुंतवणूक क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०१५ नंतर सेन्सेक्सने चांगला परतावा दिला. या काळात कोणतीही मोठी पडझड झाली नाही. या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्सने १७ टक्के परतावा दिला आहे. पुढील काही महिन्यांतही बाजार १८ टक्के वेगाने वाढेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे.

३८  इतके सरासरी वय तरुण   गुंतणूकदारांचे २०१८ मध्ये होते.

३२  इतके सरासरी वय ऑगस्ट २०२४ मध्ये  तरुणांचे आहे. 
 

Web Title: Young people become investors; 40% only in thirties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.