Join us  

तरुणांना कॉपी-पेस्टही जमेना, अगदी साधे कौशल्यही नाही; नोकरी शोधूनही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 8:59 AM

देशातील तब्बल ५४.३ टक्के तरुणांना कॉम्प्युटरवर  साधे कॉपी-पेस्टही करता येत नसल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

मुंबई : भारत हा जगातील सर्वात तरुण असलेल्या देशांपैकी एक आहे. असे असताना देशातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील ३२.९ टक्के तरुण शिक्षण घेत नाहीत किंवा नोकरीही करीत नाहीत. ते कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षणही घेत नाहीत. याच वेळी देशातील तब्बल ५४.३ टक्के तरुणांना कॉम्प्युटरवर  साधे कॉपी-पेस्टही करता येत नसल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

सांख्यिकी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) जारी केलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.ग्रामीण भागातील १५ ते २४ वर्षे वयोगटातील ५८.१ टक्के तरुणांना साधे फाइल किंवा फोल्डर कॉपी करणे किंवा इतर ठिकाणी हलविणे जमत नाही. ग्रामीण भागातील याच वयोगटातील तरुणींमध्ये हेच प्रमाण तब्बल ७१.६ टक्के इतके अधिक आहे. शहरी भागात शिक्षणाच्या सुविधा अधिक असल्याने यात थोडी वाढ दिसते. कौशल्य नसल्याने अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतानाही त्यांना नोकरी मिळत नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. 

साधा ई-मेलही पाठविता येत नाहीपदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या या तरुणांना कागदपत्रांच्या फाइल्ससह ई-मेल पाठवताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील तब्बल ७५.८% तरुण, तर ८४.१% शिक्षण घेतलेल्या तरुणींना ई-मेल पाठविता येत नाही. शहरी भागात ५१% तरुणांनाही ई-मेल पाठविता येत नाही.

हे जमत नाही    ग्रामीण     शहरीस्प्रेडशिटमध्ये मूलभूत अंकगणित सूत्रे वापरणे     ९३.१     ७७.८ नवीन डिव्हाईस कनेक्ट करणे     ८९.९     ७२.४ फाइंड, डाउनलोड करणे, सॉफ्टवेअर कॉन्फिगर करणे     ८०.७     ६२.२ इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन तयार करणे     ९४.१     ८०.९ कॉम्प्युटरवरून दुसऱ्या डिव्हाइसवर फाइल ट्रान्सफर करणे     ८२.९     ६०.७ विशिष्ट प्रोग्रामिंग भाषा वापरून संगणक प्रोग्राम लिहिणे     ९८.३     ९३.९ 

सर्वाधिक कौशल्य कुणाकडे?१५ ते २४ वय । कॉपी-पेस्ट करणे    केरळ    ९२.३     लडाख    ८०.७     सिक्कीम    ७७     कर्नाटक    ६४     महाराष्ट्र    ५४.४     गुजरात    ५५.४     बिहार    ३०.६     आसाम    २६.९ 

कुठे रिकामटेकडे अधिक?शिक्षण, नोकरी, प्रशिक्षणही नाही    लक्षद्वीप बेट    ५३.६     आसाम    ३९.२     ओडिशा    ३९.४     उत्तराखंड    ३८.९     उत्तर प्रदेश    ३६.७     प. बंगाल    ३७.२     महाराष्ट्र    २५.३     गुजरात    ३३.९

टॅग्स :नोकरी