तुम्ही अनेकदा CIBIL हा शब्द ऐकला असेल. हा शब्द हिस्ट्री आणि क्रेडिट ब्युरोचा पर्याय बनला आहे. एक क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो आर्थिक संस्थांद्वारे देण्यात आलेल्या डेटाच्या आधारावर कर्ज घेणाऱ्यांच्या क्रेडिट ट्रान्झॅक्शन्सची माहिती संग्रहित कतो. CIBIL स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्याच्या एक नंबर असतो, जो अर्थिक संस्थांसोबतच्या देवाणघेवाणीवर अवलंबून असतो.
तुमचा CIBIL स्कोअर जितका जास्त तितकी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यताही जास्त आणि अटीही कमी असतात. परंतु तुम्ही यापूर्वी कोणतंही कर्ज घेतलं नसेल आणि कोणतंही क्रेडिट कार्ड जरी वापरलं नसेल तर तुमचा CIBIL स्कोअर शून्य असू शकतो. जर क्रेडिट ब्युरोकडे उपलब्ध असलेली तुमची क्रेडिट हिस्ट्री सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीची असेल तर क्रेडिट स्कोअर एकही असू शकतो. नव्या कर्जदारांसाठी CIBIL १ ते ५ दरम्यान स्कोअर देतो.
"ग्राहकाला कोणतीही संस्था क्रेडिट सुविधा देण्यापूर्वी कर्जदात्यानं ठरवून दिलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड करेल का नाही याची खात्री करते. क्रेडिट इन्फर्मेशन ब्यूरो आपल्या क्रेडिट स्कोअरच्या माध्यमातून कर्जदात्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम करतं. सॉफ्टवेअरद्वारे विविध पॅरामीटर्सच्या मदतीने क्रेडिट स्कोअर तयार केले जातात. ७५० पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकाला सहजरित्याही कर्ज दिलं जातं," अशी माहिती कर व गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांच्या दिली.
ज्याची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नाही त्या व्यक्तीला कर्ज मिळू शकतं का नाही हा पहिलं अंड का कोंबडी असा प्रश्न असल्याचं जैन म्हणाले. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीनं कर्जचं घेतलं नाही तोवर त्याची क्रेडिट हिस्ट्री कशी तयार होऊ शकते. दरम्यान, क्रेडिट हिस्ट्री हा एकमेव पर्याय नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. जरी तुमची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसेल तरी तुम्ही गृहकर्ज घेऊ शकता. परंतु त्या कर्जदाराला अधिक डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. यामुळे तो कर्जदार वेळेत ईएमआय देऊ शकतो का नाही किंवा ते भरण्याची त्याची क्षमता आहे का नाही याची माहिती घेतली जाते, असंही त्यांनी नमूद केलं.
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो २००५ मध्ये
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो २००५ मध्ये अस्तित्वात आला. परंतु त्यापूर्वीपासूनच कर्ज घेत आहेत. ज्यांची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नाही अशांची शैक्षणिक योग्यता आणि जॉब प्रोफाईल कर्जदाते तपासून पाहतात. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती कर्जदात्यांना मिळते. जर कोणी सरकारी कर्मचारी उच्च पदावर कार्यरत असेल तर त्यांना कोणतीही हिस्ट्री नसतानाही सहजरित्या कर्ज मिळू शकतं, असंही जैन म्हणाले.
तुमचा Credit Score शून्य आहे?, तरीही मिळू शकतं Loan; जाणून घ्या कसं आहे शक्य
Credit Score : पाहा कसं ठरतं क्रेडिट स्कोअरवरून कोणाला द्यायचं कर्ज, वाचा शून्य क्रेडिट स्कोअर असेल तर कसं मिळेल कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:31 PM2021-02-17T18:31:43+5:302021-02-17T18:36:45+5:30
Credit Score : पाहा कसं ठरतं क्रेडिट स्कोअरवरून कोणाला द्यायचं कर्ज, वाचा शून्य क्रेडिट स्कोअर असेल तर कसं मिळेल कर्ज
Highlightsक्रेडिट स्कोअरवरून कोणाला द्यायचं कर्जक्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो २००५ मध्ये आला अस्तित्वात